कराड नजीक सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील गॅसची अचानक गळती
कराड नजीक सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील गॅसची अचानक गळतीSatara News Team
- Thu 23rd May 2024 12:38 pm
- बातमी शेयर करा
कराड : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक मलकापूर हद्दीत कराड खरेदी विक्री संघ इमारतीशेजारी भारती बँक परिसरात सर्व्हिस रस्त्यावर एका सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील गॅसची अचानक गळती सुरु झाल्याची घटना आज गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडून गेला. दरम्यान, ज्या ठिकाणी सीएनजी गॅस गळतीचा टँकर उभा होता. त्या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ थांबविण्यात आली आहे. तर परिसरातील इमारतीमधील लोक देखील इमारतीतून बाहेर यावे लागले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, कोल्हापूरहून सातारच्या दिशेने एक सीएनजी गॅसच्या टाक्या घेऊन ट्रक निघाला होता. ट्रककराडजीक मलकापूर हद्दीतील खरेदी विक्री संघ पेट्रोल पंप हद्दीत इमारतीशेजारी भारती बँक परिसरात आला. महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने या ठिकाणी दोन्ही लेनवरील वाहतूक हि सर्व्हिस रोडवरून सुरु ठेवण्यात आली आहे. या सर्व्हिस रोडवरून सातारच्या दिशेने सीएनजी गॅसच्या टाक्यांनी भरलेला ट्रक निघाला असताना अचानक ट्रकमधील टाक्यातून सीएनजी गॅस बाहेर येऊ लागला. गॅस बाहेर येत असल्याचे ट्रकमधील ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने त्याने तो ट्रक खरेदी विक्रि संघाच्या इमारतीसमोर सर्व्हिस रस्त्यावर उभा केला.
ट्रक मधील सीएनजी गॅस बाहेर येत असल्याचे परिसरात इमारतीमधील राहत असलेल्या रहिवाशांनी पाहिले. त्यांनी तत्काळ इमारत इमारतीतून खाली धाव घेतली. तसेच इतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना दिली. घटनास्थळी ड्रॉयव्हरने प्रसंगावधान राखत लिकेज झालेल्या सीएनजी टाक्याचे लिकेज काढून बाहेर पडणारा सीएनजी गॅस बंद केला. साधारण एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सीएनजी गॅसवर नियंत्रण मिळवण्यात ड्रायव्हरला यश आले. त्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
एक तासांचा थरार अन् नागरिकाचा जीव टांगणीला
गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर नजीक भारती बँक परिसरात सर्व्हिस रस्त्यावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सीएनजी टाक्यातील गॅस गळती झाल्याची घटना घडली. यावेळीच परिसरात असलेल्या रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडून गेला. त्यांनी इमारतीतून बाहेर धाव घेतली. तर सर्व्हिस रोडवरील सातारच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीकाळ थांबविण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कँडी देखील निर्माण झाली. हि सीएनजी गॅस गळतीची थरारक घटना एक तपासात घडली. या घटनेमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता.
#CNGGAS
स्थानिक बातम्या
शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.
- Thu 23rd May 2024 12:38 pm
औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.
- Thu 23rd May 2024 12:38 pm
सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार
- Thu 23rd May 2024 12:38 pm
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Thu 23rd May 2024 12:38 pm
२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन
- Thu 23rd May 2024 12:38 pm
संबंधित बातम्या
-
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Thu 23rd May 2024 12:38 pm
-
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Thu 23rd May 2024 12:38 pm
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Thu 23rd May 2024 12:38 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Thu 23rd May 2024 12:38 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 23rd May 2024 12:38 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Thu 23rd May 2024 12:38 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Thu 23rd May 2024 12:38 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Thu 23rd May 2024 12:38 pm













