कराड शहर डीबी पथकाने रोखली चेन स्नॅचिग धारधार शस्त्र व मुद्देमालासह एक आरोपी अटक
Satara News Team
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
- बातमी शेयर करा
कराड : पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर यांनी कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना कराड शहरात होणाऱ्या चेन स्नॅचिंगचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन सदरचे गुन्हे रोखण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक कराड शहराचे वेगवेगळया भागात पथक तयार करुन प्रतिबंधक गस्त करीत होते.
दि. 08 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हे पकटीकरण पथक कराड शहर तसेच उपनगरात चेन स्नॅचिंगचे अनुषंगाने प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांचे गोपनीय बातमीदाराने मलकापुर ते ढेबेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर एक इसमाने चाकुचा धाक दाखवुन महिलेच्या गळयातील सोन्याची चेन हिसकावुन घेवनु पळाल्याचे माहिती दिली. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकास तात्काळ घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे हे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास नागरीकांचे मदतीने शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीचे ताब्यातुन एकुण 30,000/- रुपये किंमतीची अर्ध्या तोळयाची सोन्याची चेन व धारधार शस्त्र जागीच जप्त करण्यात आले आहे.
सुरेश सिध्दाप्पा दौडमणी वय 30 वर्षे रा. कोयना वसाहत मलकापुर ता. कराड जि. सातारा असे संशयीताचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन.पाटील (कराड शहर पोलीस ठाणे ) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक पवार, सफौ. रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 9th Feb 2024 04:32 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 9th Feb 2024 04:32 pm













