बाजार समिती व्यापारवृद्धीतून शेतकरी हित जोपासणार आ. शिवेंद्रसिंहराजे; खिंडवाडी येथे जनावरांच्या बाजाराला मोठा प्रतिसाद
Satara News Team
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
- बातमी शेयर करा
सातारा : गेली अनेक वर्ष बंद झालेला जनावरांचा बाजार आज पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आणि खास करून पशु पालक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. बाजार समितीच्या नवीन जागेत विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार उभारणीचे काम सुरु झाले असून याठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. सातारा बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारवृद्धी होणार असून शेतकरी हित जोपासण्याला प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीने खिंडवाडी येथील जागा मिळवली असून या ठिकाणी विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार विकसित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जागेच्या अभावी गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे बाजार बंद होता. बाजार समितीकडे पुरेशी जागा उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सोयीसाठी या ठिकाणी दर रविवारी जनावरांचा बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रमुख उपस्थितीत जनावरांच्या बाजाराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उप सभापती मधुकर पवार यांच्यासह सर्व संचालक, विविध मान्यवर आणि पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनावरांचा व्यापार करणाऱ्या लोकांकडून अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. शेतकऱ्यांना उच्च प्रतीची, जातिवंत जनावरे स्वतः पाहून, पसंत करून योग्य किमतीत खरेदी करता यावीत, तसेच इच्छुक शेतकऱ्यांना आपली जनावरे योग्य किमतीत विक्री करता यावीत यासाठी बाजार समितीच्या खिंडवाडी येथील विकासरत्न अभयसिंहराजे भोसले उपबाजार येथे आठवडा जनावरे बाजार सुरु करण्यात आला आहे. लवकरच याठिकाणी जनावरांचा दवाखाना सुरु करणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जाहीर केले. तसेच याठिकाणी लवकरच सुसज्ज आणि अद्यावत मार्केट यार्ड उभारून व्यापारी आणि शेतकऱ्यांची गैरसोय दूर केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Sun 30th Jul 2023 12:44 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sun 30th Jul 2023 12:44 pm













