अतिवृष्टीत बेघर झालेले मागासवर्गीय कुटंब घरकुलापासून वंचित
ल्हासुर्णे येथील प्रकार, रमेश उबाळे याचे जिल्ह्याधीकाऱ्यांकडे धाव, कोरेगाव पं.समितीचे प्रशासन हादरलेSatara News Team आज्जू मुल्ला
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
- बातमी शेयर करा
रमेश उबाळे यावेळी म्हणाले. याबाबत रमेश उबाळे पुढे म्हणाले, आपण सन २०१९ ते २०२२ या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुल योजनेची माहिती घेतली असता शासकीय योजनेअंतर्गत तब्बल २१३ घरकुल मंजूर झाल्याचे निदर्शनास आले
कोरेगाव : तीन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील समीर बाबूराव उबाळे या मागासवर्गीय कुटूंबाचे घर पडून हे कुटूंब पूर्णतः बेघर होऊन रस्त्यावर आले. दरम्यान या पीडित कुटूंबाला रमाई घरकूल योजनेतून घर मिळावे म्हणून सततचा पाठपुरावा करूनही हे कुटूंब घरकुलापासून वंचित राहिले आहे. दरम्यान याबाबत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी माहिती घेतली असता या कालावधीत २१३ घरकुल मंजूर झाल्याचे उघड झाल्याने संतप्त होवून रमेश उबाळे यांनी थेट जिल्ह्याधिकारी कार्यालयात धाव घेऊन निवेदन देऊन दाद मागीतल्यानंतर संपूर्ण कोरेगाव पंचायत समितीचे प्रशासन पुरते हादरून गेले.याबाबत अधिक माहिती अशी की, सुमारे तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये ल्हासुर्णे गावात राहणाऱ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये राहत असलेल्या समीर बाबुराव उबाळे यांच्या घराची भिंत मध्यरात्री कोसळली परंतु सुदैवाने या घरात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. परंतु कौटूंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने हे कुटूंब पूर्णतः बेघर झाले.या पडलेल्या घराचा पंचनामा ल्हासुर्णे गावच्या तलाठी व ग्रामसेवकानी केला आह या प्रकरणी रमेश उबाळे यांनी प्राधान्याने लक्ष घालून या पीडित कुटूंबाला तातडीने घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून कोरेगाव पंचायत समितीमध्ये प्रस्ताव सादर केला. परंतु पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक या पीडित कुटुंबाला कोणतीही मदत केली नसून घरकुल मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका उदासीन असल्याचे दिसत आहे असे रमेश उबाळे यावेळी म्हणाले. याबाबत रमेश उबाळे पुढे म्हणाले, आपण सन २०१९ ते २०२२ या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुल योजनेची माहिती घेतली असता शासकीय योजनेअंतर्गत तब्बल २१३ घरकुल मंजूर झाल्याचे निदर्शनास आले आहे. तथापी या मंजूर झालेल्या घरकुलाच्या अनुक्रमात समीर बाबुराव उबाळे यांचे नाव १६ व्या अनुक्रमांकावर असूनही या पीडित कुटुंबाला घरकूल योजनेचा लाभ मिळाला नसल्याने मागासवर्गीयांच्या प्रश्नांबाबत प्रशासन उदासिन का आहे? याची चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. संबंधीत कुटूंब ल्हासुर्णे गावचे आहे आपणही त्याच गावचे असल्याने हे आपल्या निदर्शनास आल्याने पोटतीडकीने आपण हा प्रश्न मांडत आहे. परंतु एखाद्या कुटूंबाला तीन तीन वर्षे घरकुल योजनेचा लाभ मिळत नसेल तर कसली ही दिरंगाई? असा प्रश्न उपस्थित करून रमेश उबाळे म्हणाले, प्रशासनातल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. याबाबत आपण जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निवेदन दिले असून ते आपल्या निवेदनाची दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करतील याचा आपणास विश्वास आहे.
चौकट समीर उबाळे यांना लवकरच घरकुलाचा लाभ- गटविकास अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाची प्रत रमेश उबाळे यांनी कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सादर करत गेल्या तीन वर्षांत २१३ घरकुल आपणच मंजूर केली आहेत याबाबत इतंभुत माहिती व पुरावे देऊन प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर त्यांनी संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्याला बोलवीले कर्मचाऱ्याने गेली तीन वर्षे रमाईसाठी आधीकचे अनुदान आले नसल्याचे नमूद केले परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत आपण लवकरात लवकर या पीडित कुटूंबाला घरकुल योजनेचा लाभ देऊ असे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी रमेश उबाळे यांना दिलेरमेश उबाळे यांनी पीडित कुटूंबाला दिले स्वतःचे घररमेश उबाळे हे कन्स्ट्रक्शन व्यवसायात असून साताऱ्यात त्यांचा व्यवसायात आहेत ल्हासुर्णे गावचे रहिवासी असलेल्या रमेश उबाळे यांची ल्हासुर्णे येथे प्रॉपर्टी आहे. गेली तीन वर्षे हे पीडित कुटंब रमेश उबाळे यांनी दिलेल्या घरामध्ये राहत आहे.
फोटो ओळ- गटविकास अधिकाच्याना निवेदन देताना रमेश उबाळे त्यांचेसोबत सुनील उबाळे.
gharkul
lasurne
koregon
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात धनशक्ती तेजस्वी' होणार की जनशक्तीची सरिता वाहणार?
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
-
फलटण नगरपालिका निवडणुकीतला पराभव राजे गटासाठी की शिवसेना एकनाथ शिंदेचा?
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
-
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
-
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली
- Sun 3rd Jul 2022 02:05 pm











