श्री.संत बयाजी महाराज दिंडी सोहळ्याचे चोराडे तुन पंढरपुरला प्रस्थान:चोराडेसह परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती 

या दिंडी सोहळयातील रथामध्ये श्री.संत बयाजी महाराजांची पालखी ठेवण्यात आली असुन रथाबरोबर वारकरी चालताना अभंग, हरिपाठ, भजन करीत ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करित पालखी सोहळा पंढरपुराकडे चालला आहे.

पुसेसावळी  : खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री.संत बयाजी महाराज दिंडी सोहळ्याचे चोराडेतुन पंढरपुरला प्रस्थान  झाले असुन या दिंडी सोहळ्यात चोराडे, ढाणेवाडी, निमसोड,येडे,उपाळे(मायणी), पवारवाडी,म्हासुर्णे, बेलवडे,दापोली या गावातुन सुमारे दोनशे ते अडिचशेच्या आसपास वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

या दिंडी सोहळयातील रथामध्ये श्री.संत बयाजी महाराजांची पालखी ठेवण्यात आली असुन रथाबरोबर वारकरी चालताना अभंग, हरिपाठ, भजन करीत ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करित पालखी सोहळा पंढरपुराकडे चालला आहे.या पालखी सोहळयात महिलावर्ग मोठया प्रमाणात सहभागी झाले आहेत.

दिंडी चालक ह.भ.प.प्रकाश लोकरे महाराज यांच्या अधिपत्याखाली हा दिंडी सोहळा गेल्या १० वर्षापासुन अविरथपणे सुरु आहे. तरी पांडुरंगाच्या आर्शिवादाने श्री.संत बयाजी महाराज दिंडी सोहळा दिवसेंदिवस वाढत चाललेला असुन या दिंडी सोहळयास चोराडे व परिसरा तील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला