छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही :- धैर्यशील कदम.

सातारा  : सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा आहे सातारा ही स्वराज्याची राजधानी आहे अशा या सातारा शहर परिसरामध्ये समाज माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्याचा निंदनीय प्रकार घडला आपल्या महाराष्ट्रात वारंवार असे प्रकार घडत असून समाजकंटक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान भारतीय जनता पार्टी अजिबात सहन करणार नाही येथून पुढे जर शिवप्रेमींच्या भावना दुखवाल तर खबरदार असा इशारा भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिला.

    छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारी असून ती समाजात विषमता पेणारी नसताना अशा प्रकारे युगपुरुषाचा अवमान करणे अत्यंत चुकीचे आहे छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे अराध्य दैवत आहेत संपूर्ण जगात आदर्श समजले जाणारे राजे आहेत असे असताना सातारा शहर परिसरातून समाज माध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध केल्याबद्दल सातारा जिल्ह्यात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे आमची प्रशासनाला विनंती आहे अशा समाजविघातक जाती-जाती धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून असे अपकृत्य करण्यास यापुढे कोणाचे धाडस होणार नाही प्रशासनाने जर कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त