छत्रपती शिवाजी कॉलेजेमध्ये शहीद वीर व राष्ट्रनिर्मात्याना मानवंदना

मुंबई व कारगिलमधील दहशतवादी हल्ल्याचे प्रात्यक्षिके सादर,कॉलेज झाले युद्धभूमी

सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये रोमहर्षक युद्ध प्रात्यक्षिकाच्या  माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.  महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे आरोहण करून कार्यक्रमाची सुरुवात  झाली. सिनियर अंडर ऑफिसर किशोर पंडित,  प्रियंका  चव्हाण,  ज्युनियर अंडर ऑफिसर अनिकेत ननवरे, मानसी जाधव, सार्जंट प्रज्वल निकम व अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली   छात्र सैनिकांनी मार्च पास संचलन करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली.त्यानंतर छात्र सैनिकांनी फूट ड्रिल व रायफल ड्रिल डेमो सादर करून सैनिकी शिस्तीचे प्रदर्शन केले.   लेफ्टनंट प्रा.केशव पवार, ट्रेनिंग केअर टेकर वैभव भोसले, विशाल सनदी यांच्या नेतृत्वाखाली 26 /11 ला झालेल्या मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्याला भारतीय सैन्य दलाच्या सुरक्षा कमांडोंनी  कसे चोख उत्तर दिले याचे  रोमांचकारी प्रदर्शन सादर करून प्रेक्षकांच्या मनातात राष्ट्र प्रेम आणि सैनिकांच्या प्रती आदराची भावना निर्माण करण्यात आली. कॉलेजमध्ये साक्षात युद्ध चालू असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्याचबरोबर एन.सी.सी प्रथम वर्षाच्या मुलींनी व पोलीस भरती अकॅडमीच्या मुलींनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून  राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊन उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे  प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. विठ्ठल शिवणकर उपस्थितांना संबोधित केले. शहीद वीर व राष्ट्रनिर्मात्यांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून नवीन पिढीने संविधानातील  समतेचा प्रकाश होऊन भारताला सुजलाम सुफलाम करण्याचे आवाहन त्यांनी केले. सैन्य दलात निवड झालेल्या एन.सी.सी. च्या दहा कॅडेट्स व विशेष क्रीडा खेळाडूंचे सत्कार करून त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रोशनआरा शेख , डॉ. रामराजे मानेदेशमुख, प्रा.डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. सुभाष कारंडे, डॉ. सविता मेनकुदळे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यानी उपस्थित राहून विद्यार्थांचे कौतुक केले. या वेळी राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या राजवेध या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे प्रकाशन देखील प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले. कमवा आणि शिका योजनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रसवंतीगृह उद्घाटन महाविद्यालयात करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रात्यक्षिक सादरीकरण यशस्वी करण्यासाठी  सार्जंट ओंकार करंदकर, प्रथमेश दुर्गुळे ,समीर शिंदे, गायत्री भिलारे, सोनाली कदम, प्रियंका जायगूडे, प्राची जगताप, साक्षी शिंदे, निकिता कणसे, अंजली प्रजापत यांनी विशेष परिश्रम घेतले.तर कार्यकर्माच्या उत्तम सादरीकरणासाठी विक्रम घाडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.लेफ्टनंट केशव पवार,प्रा.विक्रम ननावरे तसेच एन.सी.सी विभाग,क्रीडा विभाग सांस्कृतिक विभाग इत्यादी विभागानी समन्वयाने प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन केले. 

 

 

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त