मेढा महाबळेश्वर रस्त्यादरम्यान केळघर घाटामध्ये आज पहाटे दरड कोसळली

पाचगणी :  मेढा महाबळेश्वर रस्त्यादरम्यान केळघर घाटामध्ये आज पहाटे दरड कोसळली. त्यामुळे काही प्रमाणात घाटात वाहतूक ठप्प झाले होती. मात्र स्थानिक व वाहन चालकांनी कोसळलेली दरड व मोठे दगड हाताने बाजूला करत रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी सुरळीत केला.

काळ्या कडाच्या काही अंतरावरच एका अरुंद वळणावर दरड कोसळण्याचे प्रमाण दरवर्षी कायम आहे. याहीवर्षी इथे मोठे दगड व माती डोंगर माथ्यावरून वाहत आले. रस्त्यावर ही दरड कोसळली. वास्तविक रस्ता रुंदीकरण करत असताना संबंधित विभागाने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मेढा महाबळेश्वर केळघर घाट हा वाहतुकीसाठी आज असुरक्षित आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त