शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात राजाळे येथे अंत्यसंस्काऱ
Satara News Team
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शहीद जवान वैभव संपतराव भोईटे यांच्या पार्थिवावर आज राजाळे, ता. फलटण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी भरत बोडरे, बीड जिल्हा कारागृह अधीक्षक विलास भोईटे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, राजाळेच्या सरपंच स्वाती दौंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसाहेब काळे यांनी शहीद जवान वैभव भोईटे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.शहीद वैभव भोईटे यांचे वडील संपतराव भोईटे यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.लडाख येथे देशसेवा बजावत असताना झालेल्या अपघातात वैभव भोईटे शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पती, पत्नी व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 22nd Aug 2023 12:22 pm













