पांढरी स्ट्रॉबेरी... सहा पट देते उत्पन्न! देशातील पहिला प्रयोग वाईत
Satara News Team
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
- बातमी शेयर करा
सातारा - वाई तालुक्यातील फुलेनगर येथील प्रयोगशील युवा शेतकरी उमेश दत्तात्रय खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन काही हटके प्रयोग करण्याच्या उद्देशाने या स्ट्रॉबेरीची लागवड केल्याचे त्यांनी ‘सातारा न्यूज ’शी बोलताना सांगितले.
बाजारातील मागणी लक्षात घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा प्रगतिशील शेतकरी उमेश खामकर यांनी निवडला आहे.
देशातील पहिला प्रयोग वाईत
फ्लोरिडा पर्ल जातीच्या स्ट्रॉबेरीचे पीक पहिल्यांदा अमेरिका आणि युकेमध्ये घेण्यात आले. याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे पुढे वेगवेगळ्या भागांमध्ये याचे उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली. भारतात मात्र हा प्रयोग करण्यासाठी पहिला प्रयत्न असल्याचा दावा उमेश खामकर यांनी केला आहे.
यासाठी फ्लोरिडा विद्यापीठाची रॉयल्टी राइट्स त्यांनी विकत घेतले. त्यामुळे भारतात कुठेही या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायचे असेल्यास खामकर यांची परवानगी लागेल.
२० गुंठे क्षेत्रात १० हजार रोपे लावली
नोव्हेंबर २०२३ मध्ये २० गुंठ्यांच्या क्षेत्रात खामकर यांनी दहा हजार रोपे लावली. यातून जानेवारीमध्ये उत्पन्नास सुरुवात झाली. साताऱ्यासह अन्य ठिकाणीही त्यांनी फळे विक्रीला ठेवली. पांढरी स्ट्रॉबेरी सहापट उत्पन्न देत असल्याचे ते सांगतात.
फ्लोरिडा पर्लची ही आहे खासियत
स्ट्रॉबेरी म्हटलं की, आंबटपणा अगदी ठरलेला असतो, मात्र फ्लोरिडा पर्ल याला अपवाद आहे. अन्य स्ट्रॉबेरीच्या जातींच्या तुलनेत ही नैसर्गिकदृष्ट्या गोड स्ट्रॉबेरी आहे.
चौकट
स्ट्रॉबेरीचा ग्राहक लक्षात घेता त्यांना नवनवीन प्रकारच्या स्ट्रॉबेरी खाण्यामध्ये अधिक रस असतो. वर्षानुवर्षे लाल चुटूक स्ट्रॉबेरी
खाणाऱ्या ग्राहकाला फ्लोरिडा पर्ल निश्चितच आकर्षित करणारी आहे.
- उमेश खामकर, प्रगतिशील शेतकरी
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 30th Jan 2024 02:39 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 30th Jan 2024 02:39 pm













