धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये पित्ताशयातील खडाचे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी

धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५० वर्षीय महिलेच्या पित्ताशयाच्या झालेल्या पिशवीतील दूर्मिळ खडे  ( Gall Bladder Stones ) यावर सर्जरी टीमने केलेली शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे महिलेचे प्राण वाचले

दहिवडी : माण तालुक्यातील म्हसवड येथील डॉ. चंद्रकांत साबळे यांच्या धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५० वर्षीय महिलेच्या पित्ताशयाच्या झालेल्या पिशवीतील दूर्मिळ खडे  ( Gall Bladder Stones ) यावर सर्जरी टीमने केलेली शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे महिलेचे प्राण वाचले.पहिल्यांदाच माण तालुक्यात ही शस्त्रक्रिया पार पडली आहे.
        दिवड ता. माण येथील सुमन अशोक भोंडवे या महिलेच्या पित्ताशयात खडे असल्याचे निदर्शनास आले होते . त्यावेळी त्या महिलेची म्हसवड येथील धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येथे तपासणी करण्यात आली. या तपासणीत खडे असल्याचे निदान झाले होते. डॉ. चंद्रकांत साबळे यांनी MD Medicine डॉ. संकेत जाधव , लेप्रोस्कोपी सर्जन डॉ सबतेज जाधव , भूलतज्ज्ञ डॉ स्वरूप रावण या सर्जरी टिम बरोबर चर्चा करून तात्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यांनी प्रसंगावधान राखून त्या महिलेच्या पित्ताशयातील दुर्मिळ पिशवीतील खडे दुर्बिणीद्वारे २२ खडे काढून शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.. या शस्त्रक्रियेसाठी MD Medicine डॉ. संकेत जाधव , लेप्रोस्कोपी सर्जन डॉ. सबतेज जाधव , डॉ. चंद्रकांत साबळे यांनी विशेष प्रयत्न केले तर भूलरोग तज्ज्ञ डॉ. स्वरूप रावण व हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ यांनीही सहकार्य केले,
      या हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे पिशवीचे ऑपरेशन ( Hysterectomy) अपेडिक्स , मुतखडे तसेच पिळ पडलेली असे अनेक अवघड ऑपरेशन यशस्वी केलेली आहेत. तरी अशा आजाराने त्रस्त असणार्या रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन डॉ.चद्रकांत साबळे यांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला