महाबळेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाचा हाहाकार

शुक्रवार रात्रीच्या मुसळधारेने स्ट्रॉबेरी शेती जलमय झाल्याने आतोनात नुकसान

शुक्रवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून पावसाच्या या अस्मानी संकटाने स्ट्रॉबेरी शेती पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. याचबरोबर वाटाणा आणि बटाटा पीक हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे.

परतीच्या पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादकांना मोठा फटका बसला असून सततच्या पावसाने अगोदरच शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची लागवड करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. काही शेतकऱ्यांनी अद्याप लागवड केली नाही. बऱ्याचदा दिवाळीत स्ट्रॉबेरी विक्रीचा शुभारंभ अनेक शेतकरी करतात. परंतु यंदा पावसामुळे लागवड उशिरा झाली अजूनही काही शेतकरी लागवड करीत आहेत.

आज रात्री झालेल्या मुसळधार पावसाने स्ट्रॉबेरी शेतात पाणी साचल्याने रोपांना रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. भिलार, गुरेघर, भोसे, खिंगर, राजपूरी , आंब्रळ, मेटगुताड, पांगारी परिसरात स्ट्रॉबेरी शेतीत पाणी साचलेने शेतकरी हंगामापूर्विच आर्थिक संकटात  सापडले आहेत. त्यामुळे या शेतकरयांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

दरम्यान खिंगर , गोडवली गावातील पिकांच्या नुकसानीची पाहणी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी केली. यावेळी खिंगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विठ्ठल दुधाने,अशोक दुधाने, शंकरराव कळंबे, सुभाष कासूर्डे व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राजेंद्र राजपुरे यांनी केली आहे 

गोडवली येथील नितीन मालुसरे यांच्या शेतीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या धनदांडग्या लोकांच्या बंगल्याची संरक्षक भिंत पाण्याने कोसळून सर्व पाणी शेतात घुसले. त्यामुळे मालुसरे यांच्या स्ट्रॉबेरीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे सबंधित मालकाने मालुसरे यांना भरपाई द्यावी अशी मागणी मालुसरे यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला