चंदन वंदन गडावर विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
Satara News Team
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
- बातमी शेयर करा
चंदन वंदन : चंदन वंदन गडावर तेलंगणा राज्यातील भाग्यनगरचे आमदार राजा सिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या विजय उत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजा सिंग ठाकूर बोलताना म्हणाले की सर्व प्रथम मी त्या लोकांचे धन्यवाद मानतो की ज्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य गडावर आणले. खालून एवढा मोठा डोंगर बघून आश्चर्य वाटले. मिलिंद भाऊ एकबोटे यांच्या सारखे जेष्ठ कार्यकर्ते गडावर आले हे सुद्धा मला आश्चर्य वाटले. आज मी गडावर येथे उपस्थित माता भगिनींशी सर्व प्रथम बोलेन. गडावर रस्ता आणि मंदिर बांधण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत आहे. येथील जिल्हाधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी गडावर यावे. या मतदारसंघातील आमदार, खासदार कोण आहेत. येणाऱ्या आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांना विजयी व्हायचे असेल तर शिववंदनेश्वर मंदिर पहिले बांधा असे ठणकावून सांगितले पाहिजे. जनतेच्या हातात खूप मोठे हत्यार आहे. सोशल मिडीया आणि व्होट बँक याचा यासाठी वापर करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गडावर लक्ष देणे गरजेचे आहे. याकरिता त्यांना निवेदन देणे आवश्यक आहे. सर्व माध्यमातून मुख्यमंत्री यांना संपर्क साधा. चंदन वंदन गडावर रस्ता आणि शिववंदनेश्वर मंदिर बांधा हे सांगितले पाहिजे. हेच सांगण्यासाठी मी येथे आलो आहे.
राम मंदिर तो एक झाँकी है, काशी मथुरा अभी बाकी है. शंभर ओवैशी जरी आले तरी मंदिर हे बांधून पूर्ण होणारच. सरकार जोपर्यंत कठोर कायदे बनवत नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष करावा लागेल.
मी येथे आज आवाहन करतो की जोपर्यंत श्री. शिववंदनेश्वराचे मंदिर बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही थांबू नये. या गडावर अनधिकृत बांधकाम असेल तर ते काढून टाकावे.
यावेळी मिलिंद भाऊ एकबोटे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकूंद आफळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
बजरंग दलाचे पुणे जिल्हा येथील कार्यकर्ते संभाजी बालघरे यांना श्री. शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने शिवरत्न पुरस्कार आमदार राजा सिंग ठाकूर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या विजय उत्सवाच्या कार्यक्रमासाठी विक्रम पावसकर, रविराज भोसले, विजय गाढवे, विविध प्रतिष्ठानचे सदस्य, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक रोशन साळुंखे यांनी केले. आभार विश्वजित साळुंखे यांनी मानले.
स्थानिक बातम्या
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 21st Dec 2023 02:59 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 21st Dec 2023 02:59 pm













