सातारा सेतू गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, : साताऱ्यातील सेतू विभागातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी झालेल्या तक्रारीचा अहवाल सातारा प्रांताधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.मात्र अहवाल सादर करून पंधरा दिवस झाले तरी याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आणले असता त्यांनी जिल्हाधिकारी रजेवर असल्याने त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही.जिल्हाधिकारी आल्यानंतर अहवालानुसार तत्काळ दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगीतले.


जिल्हाधिकारी यांच्यासोबत केलेल्या करारानुसार ठेकेदाराने सेतू विभागांतील सर्व सुविधा या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून शासनाच्या पोर्टलवर नोंदी करूनच द्यायच्या आहेत.मात्र सातारा तहसिल कार्यालयातील सेतू विभागाचा ठेकेदार सार. आय. टी रिसोर्सेस या कंपनीने जुलै २०२२ पासून जून २०२३ पर्यंत प्रतिज्ञापत्रांच्या नोंदी ऑनलाईन पोर्टलवर नोंद न करता ऑफलाईन रजिस्टरवर नोंदविण्याचे बेकायदेशीर व कराराचा भंग करणारे काम केल्याचे माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले.त्यामध्ये एकूण १४ लाख ७१ हजार रुपये ठेकेदाराने शासनाकडे न भरता स्वतः वापरले असल्याचे दिसून आले.सदर आर्थिक अपहाराप्रकरणी सेतू चालविणाऱ्या ठेकेदार सार.आय. टी रिसोर्सेस या ठेकेदार कंपनीसह सेतू विभागावर नियंत्रण ठेवणाऱ्या सातारा प्रांताधिकारी आणि सातारा तहसिलदार यांचेवर कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार पत्रकार पद्माकर सोळवंडे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी श्री.डूडी यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना दिल्या होत्या. यानुसार त्यांनी चौकशी करत तक्रार अर्जातील सर्व मुद्देनिहाय अहवाल १० ऑगस्ट रोजी श्री. डूडी यांना सादर केला आहे. या अहवालात तक्रार अर्जातील प्रत्येक मुद्दे बरोबर असल्याचे व प्रत्येक बाबीत शासकीय आदेशांचे उल्लंघन झाल्याचे तसेच तक्रारीत नमूद रक्कमेपेक्षा जास्त शासकिय रक्कम वापरली असून भरली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर तक्रारीनंतर ३० हजार ८७१ प्रतिज्ञापत्रांच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदी करून १० लाख ३७ हजार रुपयांचा महसूल जमा केल्याचेही प्रातांच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

दरम्यान,याबाबत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी रजेवर असल्याने त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. ते आल्यानंतर मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून कोणीही असो, कुणाचीही गय केली जाणार नाही.प्रांतांच्या अहवालानुसार संबंधित ठेकेदार पोट ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त