म्हसवड पोलिसांची अवैध दारुविक्री व दारु वाहतूकीवर कारवाई ; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

आंधळी : म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील हिंगणी ता. माण येथे व म्हसवड परीसरात अवैध धंद्यांना आळा बसावा तसेच अवैध दारू वाहतूक व दारू विक्री बंद व्हावी या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून देशी, विदेशी, दारू विक्री व वाहतूक करताना संशयित इसमांचा पाठलाग करत पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

 सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व सहकारी टीमने कारवाई करत आरोपी तातोबा लक्ष्मण सरतापे याला ताब्यात घेतले व चौकशी केली असता हा स्वतःच्या आर्थिक फायदे करिता ताडी व हातभट्टी दारूची निर्मिती करून विक्री करत असले बाबत माहिती मिळाल्याने त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला रेड मारून त्याच्याकडून ताडी आणि हातभट्टी दारू जप्त केलेली आहे

 तसेच पेट्रोलिंग दरम्यान एक संशयीत इसम त्याच्या मोटरसायकल वरून दहिवडी ते म्हसवड जाणाऱ्या रोडवरून बेकायदा बिगर परवाना देशी, विदेशी दारूची वाहतूक करून घेऊन जात असताना त्याच्यावर संशय आल्याने त्याला थांबण्याचा इशारा करून देखील तो न थांबल्याने अधिक संशय बळावला आणि त्याचा जवळपास पाच किलोमीटर पाठलाग करून संशयित इसमासह पकडल्यानंतर त्याने त्याचे नाव पोपट पांडुरंग शिंदे रा.पानवण ता. माण असे सांगितले.त्याच्याकडे असलेल्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारू, विदेशी दारू भेटलेली असून जवळपास लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आणि या दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर अटकेची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

 सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस आमंलदार अमर नारनवर, मैना हांगे, सुरेश हांगे, नितीन निकम, संजय आस्वले, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, वसीम मुलानी, संतोष काळे यांनी केलेली आहे.


 सातारा न्यूजच्या बातमीने दहिवडी उपविभागात कारवाईंना वेग दहिवडी उपविभागात येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. सातारा न्यूजने मांडलेल्या वास्तवाची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी आपल्या विभागातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना अवैध धंद्यांवर कारवाया करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे दहिवडी उपविभागातील पोलीस ठाण्याचे कारभारी ऍक्शन मोडवर आले असून अगदीच धंद्यांवर कारवाया होत असल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त