खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक

सातारा : पूर्वीच्या भांडणातून मारहाण करून खून केल्याप्रकरणी एका तासात दोघा संशयितांना लोणंद पोलिसांनी अटक केली आहे. 

 याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, इंदीरानगर ता. खंडाळा गावाच्या हददीत बिरोबा मंदीरात दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास संशयित सतिश भाऊसो काळे व रोहीत शिवाजी डेंगरे दोघेही रा. इंदीरानगर लोणंद ता. खंडाळा यांनी पुर्वीच्या भांडणाचे कारणावरुन मयत किरण किसन गोवेकर रा. कोरेगाव ता. फलटण याला लाकडी फळकुटाने डोक्यात मारुन, चाकुने छातीत भोकसुन, चाकुने डोक्यात वार करुन ठार केल्याची घटना घडली होती घटनेनंतर संशयित फरार झाले होते. याबाबत लोणंद पोलीस स्थानकाचे सपोनि सुशिल भोसले यांनी पो उप नि विशाल कदम, म पो उ नि. ज्योती चव्हाण, पो हवा चंद्रकांत काकडे. पो कॉ. सचिन कोळेकर या पथकाने शिताफीने संशयतांना १ तासाच्या आत लोणंद येथुन ताब्यात घेतले.

सदर कारवाई लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल भोसले, सहा. पोलीस निरीक्षक, पोउनि विशाल कदम, मपोउनि ज्योती चव्हाण, पोउनि शिवाजी घुले, सपोफौ देवेंद्र पाडवी, पोहवा चंद्रकांत काकडे, नितीन भोसले, सर्जेराव सुळ, विजय पिसाळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, महेश टेकवडे, विठठल काळे, सुनिल नामदास, सचिन कोळेकर, सतीष दडस, केतन लाळगे, अभिजीत घनवट, शेख शिंगाडे, राणी कुदळे, भारती मदने, स्नेहल कापसे, होमगार्ड सचिन निकम, अनिल पवार, सुहास काटकर विकास कोकरे, यांनी सहभाग घेतला या सर्व टीमचे.पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त