घातपात करण्याचा प्रयत्न होता; एसटी काय तुझ्या गोठ्यात आली होती का?

पोलीस हवालदार निवास सानप यांचा तक्रारदाराला प्रश्न!

दहिवडी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मेढा आगाराची एसटी बस सातारवरून परळी वैजनाथ कडे जात असताना पिंगळी तालुका माण या गावच्या हद्दीत आल्यानंतर भरधाव वेगाने असलेल्या एसटी बसने गाईला जोरदार धडक दिली. यावेळी गायीचा मालक गाई शेतात घेऊन निघाला होता. भरधाव वेगात असणाऱ्या एसटी बसने गाईला जोराची धडक दिली. त्यावेळी गायीसोबत असलेला गायी मालक दत्तात्रय साहेबराव शिंगटे यांनी भरधाव बस आलेली पाहिल्यानंतर स्वसंरक्षनासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली उडी मारली. दरम्यान भरधाव आलेली एसटी बस आपल्या अंगावर येत असल्याची चाहूल लागताच शिंगटे यांनी रस्त्यावरून उडी मारली खरी परंतु एसटी चालकाचा एसटी अंगावर घालून जीवे मारण्याचा कट असल्याची शंका दत्तात्रय शिंगटे यांनी व्यक्त केली आहे.

त्यानंतर एसटी बस दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.दहिवडी पोलीस ठाण्याचे हवालदार बापू खांडे यांनी तक्रारदार तक्रार देण्यास गेल्यानंतर साहेबांना विचारून तक्रार घेतो असे म्हणाले.या प्रकारामुळे तक्रार नोंदवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकांची परवानगी घ्यावी लागते का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.यावेळी दत्तात्रय शिंगटे यांना दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार निवास सानप यांनी तक्रारदाराला अपमानित करत 'एसटी बस काय तुझ्या गोठ्यात आली होती का' असे न शोभणारे अपमानकारक वक्तव्य केले.

दरम्यान शेतकरी असलेला तक्रारदार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला की,मी रस्त्याच्या कडेने माझी गाय घेऊन शेतात निघालो होतो.यावेळी जवळपास 80 प्रतितास वेग असलेल्या एसटी बसने माझ्या गाईला जोरदार धडक दिली.यावेळी पाच महिन्यांची गाभण असलेल्या गायीच्या मागील बाजूच्या पायास जोरदार धडक बसल्याने गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस हवालदार निवास सानप यांना संपुर्ण हकीकत सांगितल्यानंतर ते म्हणाले की,एसटी काय तुमच्या गोठ्यात आली होती का? पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वसामान्यांबाबतचे हे बोलणे त्यांना शोभते का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी दहिवडी पोलीस प्रशासन गरिबांची दखल घेत नाही.

तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत.माझ्या गाईचा मृत्यू होऊनही बसची भरपाई मला मागत आहेत. गायीचा मृत्यू तर झालाच परंतु बसने मला मारण्याचा कट होता.असा खळबळजनक दावा दत्तात्रय शिंगटे यांनी केला आहे. पोलीसही बस चालकाची बाजू घेत आहेत.दहिवडी पोलीस सर्वसामान्यांवर अन्याय करत आहेत.सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे कारवाई करत नाहीत.तरी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या दहिवडी पोलीसांवर कारवाई करावी,अशी मागणी दत्तात्रय शिंगटे यांनी केली आहे.पोलीस हवालदार सानप पोलीस असूनही वर्दीविना कर्तव्य बजावत असतात.इतर पोलीस वर्दीत तर सानप वर्दीविना अधिकाऱ्यांना मर्जीतील असल्याने की वरदहस्त असल्याने चालतात हा संशोधनाचा विषय आहे.या प्रकरणामुळे दहिवडी पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार ऐरणीवर आला आहे.सर्वसामान्यांच्या तक्रारीसाठी की वरिष्ठांच्या आदेशासाठी दहिवडी पोलीस ठाणे कार्यरत आहे अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त