त्या'प्रकरणी अखेर गुन्हा दाखल..... ओळख पटवण्याचे शहर पोलिसांपुढे आव्हान.
Satara News Team
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
- बातमी शेयर करा

सातारा : कमानी हौदाजवळ डेरे मेडिकल समोरील, नगरपालिकेच्या झाडावर सपासप कोयता चालवून फांद्या तोडणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात शहर पोलिसांनी आज दखलपात्र गुन्हा नोंद केला. लोकवृत्तच्या पाठपुराव्यामुळे अखेर पोलिसांना गुन्हा नोंद करावा लागला. सातारा न्यूज कडे असलेली व्हिडिओ क्लिप पाहून त्यामध्ये दिसणाऱ्या दोन संशयीतांना जेरबंद करण्याचे आव्हान शहर पोलिसांपुढे आहे.
कमानी हौद ते जुना दवाखान्याच्या दरम्यान, डेरे मेडिकल समोर सार्वजनिक रस्त्यावर नगरपालिकेने लावलेले झाड तोडण्याचा उद्योग १७ ते १८ जूनच्या मध्यरात्री दोन संशयीतानी केला होता. या प्रकाराची चित्रफीत सातारा न्यूजच्या हाती लागल्यानंतर ती सातारा न्यूजने प्रसारित केली होती. या प्रकारामुळे सातारा शहरात तीव्र संताप दिसून आला. परिसरातील रिक्षाचालक तसेच सातारकर नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिसांनी संशयतांना कायद्याचा हिसका दाखवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सातारा पालिकेचे वृक्ष विभाग प्रमुख सुधीर चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात संशयितांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१७ ते १८ जून च्या मध्यरात्री वृक्षतोडीचा प्रकार सुरू असताना सतर्क नागरिकांनी काढलेली चित्रफित लोकवृत्तकडे आहे. आम्ही ती पोलिसांना देऊन तपास कामी पोलिसांना सहकार्य करणार आहोत. चित्रफितीत दिसणारे दोन संशयित कोण आहेत हे परिसरातील नागरिकांना चांगले ठाऊक आहे. ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान शहर पोलिसांपुढे आहे.
नगरपालिकेने लावलेलं झाड खरंतर ही नगरपालिकेची मालमत्ता आहे. पालिकेने नागरिकांकडून गोळा होणाऱ्या कर रुपी निधीतून ही झाड खरेदी केली होती त्यामुळे त्याचं नुकसान कोणी करत असेल तर त्याच्यावर नगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सातारकर नागरिकातून व्यक्त होत आहे.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी ता.खटाव येथील हुतात्मा स्मारकाला भ्रष्टाचाराची वाळवी
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
-
शिखर शिंगणापूरमधील आमरण उपोषण अखेर स्थगित!
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
-
वडी ता.खटाव येथील पारायण सोहळा दि.१४ तर मुख्य यात्रेस दि.२१ पासून प्रारंभ
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Mon 8th Jul 2024 09:21 pm
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Mon 8th Jul 2024 09:21 pm