कळंभे ,ता. वाई, येथे कारगिल शहीद शशिकांत आबासो शिवथरे यांना पुष्प चक्र अर्पण करून कारगिल विजय दिन साजरा.

वाई :वाई तालुक्यातील कळंभे येथील कारगिल शहीद जवान शशिकांत आबासो शिवथरे हे दिनांक 5- 8- 1999 या दिवशी देश सेवा बजावत असताना त्यांना हौतात्म  प्राप्त झाले .आज त्यांच्या या हौतात्म्याला 24 वर्ष पूर्ण झाली. आज कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी त्यांना  ग्रामस्थ व कुटुंबांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 
 26 जुलै हा दिवस देशभरात कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने कारगिल जवानांच्या स्मृती जागवल्या जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून कळंभे ग्रामस्थांनी शहीद शशिकांत शिवथरे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन त्यांना गंभीर वातावरणात आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गावातील जवान अक्षय शिवथरे यास सन्मान देण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमास हणमंत गायकवाड ,लक्ष्मण जाधव, विजय शिवथरे, तानाजी शिवथरे, संतोष गायकवाड, सिताराम पनवेलकर, रोहिदास शिवथरे, बाबा गायकवाड, दत्तू जाधव, ज्ञानेश्वर शिवथरे ,शरद शिवथरे, आनंदा नलवडे, रमेश वाघमारे, विश्वनाथ शिवथरे, सुनिल शिवथरे, शहीद शशिकांत शिवथरे यांचे बंधू विजय शिवथरे तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार  बापू वाघ यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला