सातारा जिल्ह्यातील युवतीला लग्नासाठी कोल्हापूरात बोलावून युवतीसोबत 15 जणांनी केले घृणास्पद कृत्य

कराड : कराड तालुक्यातील एका युवतीला लग्न करण्यासाठी युवकाने कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात बोलावून त्याठिकाणी जमावाने तिला मारहाण करत तिच्याशी घृणास्पद कृत्य केले. सदरचा प्रकार गतवर्षी 16 एप्रिल 2022 रोजी घडला होता. याप्रकरणी पिडीत युवतीने 11 मे 2023 रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेल्या एका गावामध्ये घडला होता. या प्रकारानंतर युवती मानसिक तणावाखाली होती. तसेच आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड नजीकच्या एका उपनगरात पिडीत युवती आपल्या आई-वडिलांसोबत राहते. गतवर्षी 16 एप्रिल 2022 रोजी तिच्या मित्राने फोन करून आपण विवाह करूया, असे म्हणून युवतीला बोलावून घेतले. संबंधित युवती त्याच दिवशी करवीर तालुक्यातील त्या मित्राच्या घरासमोर गेली. त्यावेळी मित्रासह त्याचे अन्य नातेवाईक तेथे होते. सुमारे पंधरा जणांनी युवतीला शिविगाळ, दमदाटी करण्यास सुरूवात केली.

उपस्थित मित्र व नातेवाईकांनी तुला विवाहासाठी आम्ही बोलवले नाही, असे म्हणून त्यांनी युवतीला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिला एका शेतात नेऊन त्याठिकाणी मारहाण केली. तिच्या अंगावर पाणी, शेण, माती तसेच काटे टाकण्यात आले. काही महिलांनी युवतीचे केस पकडून तीला फरपटत नेले. शिविगाळ करुन तीला तु पुन्हा येथे यायचे नाही, असे म्हणून तिच्यासह तिच्या आई, वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पिडीत युवती गत वर्षभर मानसिक तणावाखाली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला