जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा येथे पुन्हा नव्याने सिटीस्कॅन मशीन कार्यान्वित

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालय हे गोरगरिबांचं आरोग्याचे महत्त्वाचे स्त्रोत आहे .गोरगरीब रुग्णांना प्रायव्हेट मध्ये सिटीस्कॅन करणे करणे खूप खर्चिक असते त्यामुळे गेली सात महिने बंद असणारे सिटीस्कॅन मशीन नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठता डॉ रवींद्रनाथ चव्हाण यांच्याशी समन्वय साधून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्याने दिनांक 15 ऑगस्ट पासून सिटीस्कॅन मशीन पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले . याचा गरजू आणि गरीब रुग्णांनी फायदा घ्यावा तसेच ज्या रुग्णांना डॉक्टरच्या सल्ल्याने सिटीस्कॅन काढायला सांगितलेले आहे अशाच रुग्णांनी सिटीस्कॅन साठी आग्रह धरावा कारण सिटीस्कॅन करणे रेडिएशन मुळे धोका होऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने सिटीस्कॅन साठी आग्रह धरू नये असे आव्हाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केलेले आहे . डॉक्टर युवराज करपे यांनी केले आहे . जिल्हा रुग्णालयाची सूत्रे हातात घेतल्यापासून अनेक रुग्णाच्या संबंधित योजना आणि सेवा साठी नेहमी अग्रक्रम दिलेला आहे. रुग्णालयातील स्वच्छतेवर जास्त भर दिला,बंद पडलेली वैद्यकीय उपकरणे पुन्हा कार्यान्वित केली. मुख्यमंत्री निधी सारख्या योजनेसाठी सहज सेवा उपलब्ध व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय च्या वैद्यकीय अधीक्षकांना विशेष अधिकार देऊन रुग्णाचे नातेवाईक व रुग्ण यांची हेळसांड थांबवली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला