स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई

वाहन चोरीचे गुन्हे उघड करून १,१५,००,०००/- रुपये किमतीची १० चारचाकी वाहने केली जप्त

सातारा : परराज्यातून सातारा जिल्ह्यात चार चाकी दुचाकी वाहने चोरून आणून सातारा जिल्ह्यामध्ये वाहने विकणारा सातारा जिल्ह्यातीलच रहिमतपूर येथील अजीम सलीम पठाण वय 38 याला सातारा पोलिसांनी सापळा रुचून जेरबंद केला आहे.
या पठाणाच्या चोरीचा धंदा सातारा पोलिसांनी उघड केला आहे.
त्याच्याकडून १० चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघड करुन १,१५,००,०००/- रुपये किमतीची १० चारचाकी वाहने जप्त करुन आंतरराज्यीय टोळी जेरबंद तसेच पोलीस अभिलेखावरील तीन आरोपींचेकडून ३,२०,०००/- रुपये किमतीच्या ८ चोरीच्या मोटार सायकल हस्तगत) केले आहे सातारा जिल्ह्यातील वाहन चोरी करणारी ही सगळ्यात मोठी कारवाई सातारा पोलिसांनी करून दाखवली आहेश्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली तीन तपास पथक तयार केले आहे.दि.३०/०४/२०२३ रोजी श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी अजिम सलीम पठाण वय ३८ वर्षे, रा. रहिमतपूर ता. कोरेगाव जि.सातारा याने परराज्यातून चोरी झालेली चारचाकी वाहने आणून ती सातारा जिल्हा व रायगड, सोलापूर जिल्हयामध्ये विक्री केली आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे तपास करुन पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला