शारीरिक शिक्षक संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

देशमुखनगर : सातारा तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विजय यादव यांची, तर सचिवपदी राजेंद्र माने यांची एकमताने निवड करण्यात आली. कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. वाय . जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. या वेळी
विष्णू शिबे, यशवंत गायकवाड,  ज्ञानेश्वर जांभळे तसेच तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. त्यात कार्याध्यक्षपदी अमोल कदम, उपाध्यक्षपदी संजय बारांगळे, प्रदीप निकम, संजय राजे, गौरव जाधव, 
सहसचिवपदी सागर जाधव, खजिनदार रवींद्र जाधव, सहखजिनदार किरण वाघमोडे, संघटकपदी पांडुरंग कणसे, कैलास काशीद, किशोर संकपाळ, विठ्ठल देशमुख, अभिजित मगर, जोतिराम महाडीक, धनाजी शिंदे, अभिषेक कदम, बिपीन गायकवाड, दयानाथ पवार, लहू पवार, विनय घाडगे, महिला प्रतिनिधीपदी सीमा जाधव, मार्गदर्शकपदी जे. के. गुजर, एन.टी.जगदाळे या निवडी करण्यात आल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला