सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातून चोरलेल्या 8 मोटारसायकली अट्टल चोरट्यांकडून हस्तगत, बोरगाव पोलिसांची कारवाई
Satara News Team
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
- बातमी शेयर करा
सातारा : मोटारसायकली चोरणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आयाज इसाक मुजावर (रा. तारगाव, ता. कोरेगाव), युनुस युसुफ (रा. नागठाणे, ता. जि. सातारा) आणि सागर संतोष पवार (सध्या रा. निसराळे, ता. सातारा, मूळ रा. श्रुंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
नागठाणे गावच्या हद्दीतील ए. के. लाईट हाऊस नावाच्या दुकानासमोरुन दि.१० डिसेंबर २०२३ रोजी रात्री हिरो कंपनीची मेस्ट्रो मॉडेलची पांढऱ्या रंगाची मोपेडची (एम. एच.११ बी. एक्स. १३७९) चोरी झाली होती. याप्रकरणी समीर संजय साळुंखे (रा. अपशिंगे, ता. जि. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांचे पथक गुन्ह्याचा तपास करत होते. त्यावेळी आरोपी हा चोरीस गेलेली मोटारसायकल घेऊन बोरगावला येणार असल्याची माहिती मिळाली.
बोरगाव पोलीस पथकाने सापळा रचून बोरगावच्या हद्दीत सातारा ते कराड बाजुकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर मोटारसायकलसह संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन साथीदारांच्या मदतीने मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांना अटक करून सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातुन चोरलेल्या हिरो आणि हिरो होंडा कंपनीच्या ८ मोटारसायकली संशयितांकडून जप्त केल्या.
साताऱ्याचे पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीद्र तेलतुंबडे, पो. हे. कॉ. अमोल गवळी, अमोल सपकाळ, दादा स्वामी पो. ना. प्रशांत चव्हाण, दीपककुमार मांडवे, पो. कॉ. केतन जाधव, विशाल जाधव, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 27th Jan 2024 02:42 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 27th Jan 2024 02:42 pm













