तुझ्या डीजेचा आवाज जास्त आहे की माझ्या, अशी दोघांमध्ये स्पर्धा. कोयते, तलवारी नाचवल्या.तालुक्यात खळबळ

पोलिसांनी काही तासांतच धरपकड करून सहाजणांना अटक

सातारा :  तुझ्या डीजेचा आवाज जास्त आहे की माझ्या, अशी दोघांमध्ये स्पर्धा लागली. पाहता पाहता दोघांनीही डीजे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आणला. हाैसे, नवसे, गाैसेही खुन्नसची स्पर्धा पाहण्यासाठी जमा झाले. कानठळ्या बसणारा आवाज करत ही र्स्पधा आटोपती घेऊन पोलिसांच्या भीतीने त्यांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी काही तासांतच धरपकड करून सहाजणांना अटक केली. ही घटना लिंब, ता. सातारा येथे रात्री साडेसात वाजता घडली.  बेकायदेशीर, बिगर परवाना शस्त्र बाळगून जमाव जमवून डॉल्बी वाजवत कोयते, तलवारी नाचवल्याबद्दल जमावावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, लिंब गावाच्या हद्दीतील गौरीशंकर कॉलेज समोरील पुणे-बंगळुरु अशियाई महामार्गालगत असलेल्या सर्व्हिसरोडवर बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राजमुद्रा डॉल्बी आणि म्हसवे येथील ए.पी आऊटलाईन डॉल्बी यांच्या मध्ये कोणतीही परवानगी न घेता डॉल्बी वाजवण्याची स्पर्धा झाली. यावेळी डॉल्बीच्या तालावर नाचण्यासाठी त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. यावेळी नाचताना काही जणांनी कोयते आणि तलवारीही नाचवल्या. याबाबतची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याची माहिती मिळताच त्यातील अनेकजण पळून गेले.

हातात कोयता, तलवार घेऊन काही तरुण वाहनाच्या टपावर नाचत होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सातारा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने संबंधित सहा तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली असून, न्यायालयाने त्यांना सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

यावेळी सातारा तालुका पोलिसांनी राजमुद्रा डॉल्बी सिस्टीमचा मालक अनिकेत भालचंद्र उंबरे राहणार कोडोली ता. जि. सातारा, 2) प्रणव गजानन उंबरे राहणार कोडोली ता.जि सातारा, 3) प्रतीक दशरथ भालेराव भालेकर रा. जैतापूर ता.जी सातारा, 4) श्रेयस बाळासाहेब भोईटे राहणार पुणे, 5) ओंकार देशमुख, 6)अक्षय गायकवाड, 7) सुयश सरडे, 8) सोन्या जाधव, 9) गोरख, 10)मनोज, 11) प्रज्वल व त्याचे इतर 10 ते 15 साथीदारांनी तसेच ए.पी आऊटलाईन डॉल्बीचे मालक चालक 12) अभिषेक चव्हाण पूर्ण नाव माहित नाही राहणार म्हसवे ता.जि. सातारा,13) संग्राम शिर्के, 14) प्रतिक दत्तात्रय चव्हाण, आदेश शिर्के तिघे राहणार म्हसवे जि. सातारा, 16) विनय फरांदे राहणार आनेवाडी ता. जावली जि. सातारा, 17) ओंकार भोसले व 18) सुजल भोसले दोघे राहणार भुईंज जि. सातारा व इतर 10 ते 12 साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून डॉल्बी वाजवण्याचा कोणताही परवाना न घेता डॉल्बी वाजवण्याची स्पर्धा घेतली व स्पर्धेदरम्यान हातामध्ये कोयते तलवार घेऊन डॉल्बी सिस्टीम वर उभे राहून नाचून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल वरील सर्वाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला