महाबळेश्वर येथील घोड्याला ग्लॅडर्स रोगाचा प्रादुर्भाव; घोडेमालकांमध्ये भीतीचे वातावरण

महाबळेश्वर : पाचगणी येथील घोड्याला ग्लॅडर्स हा साथीचा रोग झाल्याचे समोर आले आहे. ज्या घोड्याला या रोगाची लागण झाली त्याला दयामरण देण्यात आले आहे.. ग्लॅडर्स रोग संसर्गजन्य असल्यामुळे 5 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.. पशुसंवर्धन विभागाकडून पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील 319 घोड्यांचे रक्ताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत..
 पाचगणी येथील ग्लॅडर्स संशयित एका घोड्याच्या रक्ताचे नमुने हरियाणा येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.. 
या पार्श्वभूमीवर पाचगणी मध्ये घोडा खरेदी आणि विक्रीला निर्बंध घालण्यात आले आहेत.
 या घटनेमुळे घोडेमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. दक्षता म्हणून पाचगणी आणि महाबळेश्वर मधील 319 घोड्यांच्या रक्तांची नमुने पशुसंवर्धन विभागाने घेतले आहेत. दरम्यान या आजारामध्ये घोड्याला ताप येऊन तो अन्न पाणी काही घेत नाही, अशक्तपणामुळे त्याला इतर त्रास होतात, घोड्याच्या त्वचेवर चिरा पडणे, सर्दी, निमोनिया सारखी लक्षणे दिसतात.
 हा संसर्गजन्य आजार असल्याने घोड्यांना विलगीकरणात ठेवण्यात येते. यापूर्वी महाबळेश्वर, नाशिक येथे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता.. या आजाराबाबत घोडेमालकांना सूचना देऊन काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला