पुणे- बेंगलोर महामार्गावर मलाबार लाॅजवर वेशा व्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा :  पुणे- बेंगलोर महामार्गावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत मलाबार लाॅजवर वेशा व्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गौतम परशुराम काकडे (वय- 28 वर्षे, रा. गौतमनगर- शिवाजीनगर, लातूर) आणि जय अमर कांबळे (वय- 20 वर्षे, रा. प्रतापसिंहनगर- सातारा) या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर  कुंटणखान्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसमांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील पूजा पेट्रोल पंप शेजारी असणारे मलाबार लॉजिंग अॅण्ड बोर्डींग या लॉजवर वेश्या व्यवसायासाठी मुली ठेवल्या आहेत. तसेच मागणी केले प्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरविल्या जातात. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी जावून छापा टाकून वेश्या व्यावसायासाठी करायला भाग पाडणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, पोलीस अंमलदार दिपक मोरे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, ओंकार यादव, पंकज बेसके, पंकजा जाधव, मोनाली निकम, माधवी साळूंखे, क्रांती निकम, आदिका वीर, अनुराधा सणस यांनी सदरची कारवाई केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त