कुकुडवाड गटाच्या सर्कलच्या कामकाजाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी व्हावी

The work of the circle of Kukudwad group should be investigated by the Divisional Commissioner

दहिवडी :  कुकुडवाड गटाच्या सर्कल अर्थात मंडलाधिकारी यांच्या गैर कामकाजाची विभागीय आयुक्तांनी चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत लोकांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या कार्यालयासमोर शेतकरी आणि गरीब लोकांना सोबत घेत गनिमी काव्याने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अंकुश नामदास यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या विभागांतर्गत कुकुडवाड मंडल येत असून या मंडलमध्ये सध्या जे मंडलाधिकारी काम करत आहेत त्याच्या कामकाजाबाबत गेली अनेक दिवस आपल्या विभागात लोकांनी भेटून तसेच लेखी तक्रारी दिलेल्या होत्या,परंतु त्या जनतेच्या माध्यमातून केलेल्या तक्रारीची दखल आपल्या विभागाच्या माध्यमातून घेण्यात आली नाही. त्यामुळेच का होईना या विभागातील मंडल अधिकाऱ्याचे मनोबल वाढले आहे आणि त्याच्या कृतीत अनेक कामे रेटून आणि नियमबाह्य करण्याचा सपाटा लावला आहे. आपल्या स्वतःकडे काहीही निर्णय देण्याचे अधिकार आहेत,असे सांगून जनतेची व शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक केली जात आहे. या मंडलाधिकारी काम करत असलेल्या गावात अनेक खाजगी वसुली अधिकारी पैसे गोळा करून काम करण्यासाठी ठेवलेले आहेत. याबाबत अनेक यंत्रणेमार्फत आपण स्वतः तपासणी करावी. या मंडल अधिकाऱ्यांनी अनेक लोकांच्या नोंदी करण्यासाठी आर्थिक तरतुदी करण्याची मागणी त्याचे वसुली एजंट करत आहेत. कोणी तक्रार केली तर हेच वसुली एजंट अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत.असा आरोपही त्यांनी या निवेदनात केला आहे. या बाबत आपल्या माध्यमातून जनतेत तक्रारी मागवण्यात याव्यात  ज्यानी तक्रार दिली ती लोकांना आपल्या माध्यमातून संरक्षण देण्यात यावे हा मंडल अधिकारी हा आपल्या स्वतःच्या नियमांचे उल्लंघन कायद्याचा आधार घेऊन करत आहे. एखाद्या व्यक्तीने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली तर त्याला माहिती न देता जबरदस्तीने माहिती दिली म्हणून लिहून घेतली जाते.असेही या निवेदनात म्हटले आहे.

  राज्यात जमीन हस्तांतरण कायदा आजही अस्तित्वात आहे.काही जमिनी सक्षम अधिकारी यांची परवानगी नसताना हस्तांतरित करता येत नाही अशी तरतूद असताना अनेक जमिनी वरील सातबारा नोंदी या मंडल अधिकाऱ्याने नोंद केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आमच्या निदर्शनास आलेल्या गोष्टी आम्ही आपणापर्यंत पोहचवल्या असून याची पण दखल घ्यावी आणि सदर मंडलअधिकाऱ्याच्या गैर कामकाजाची चौकशी करावी,अशी मागणी त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.जर वरील सर्व तक्रारीची दखल न घेतल्यास आठ दिवसात मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या कार्यलयात ठिय्या आंदोलन करणार आहे या आंदोलनात या मंडल मधील सर्व अन्याय झालेली  गोरगरीब जनता व शेतकरी यांच्या माध्यमातून गनिमीकावा वापरून आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
   त्याचबरोबर  संबंधित मंडल अधिकारी यांना संगणकाचे कोणतेही ज्ञान नाही जर यांना संगणक चालवायला येत नसेल तर आपल्या समोरील तक्रारी कश्या निकाली काढल्या जातात, सर्व दप्तर कोणत्या एजंटकडे दिली जातात याचादेखील तपास करण्यात यावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे. मंडलअधिकाऱ्याला जर संगणकाचे ज्ञान नसेल तर हा निकाल पत्र कोणाकडून लिहून घेतो कागदपत्रे कार्यालयातून बाहेर निकाल लिहण्यासाठी जातात कशी ? माण मधील महसूल अधिकारी ,तहसीलदार व प्रांत याचा या अधिकाऱ्याच्या कामकाजावर लक्ष नाही काय ? या सवालासह सदर प्रकरणाची  सखोल चौकशी करण्याची विनंतीही त्यांनी सदर निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला