मार्डीत शालेय मुलांनी भरविला बाजार

दहिवडी :  स्पर्धेच्या युगात मुलांना शालेय शिक्षण मिळत असले तरी बौद्धिक विकासाबरोबर व्यवहार ज्ञान मिळणे आवश्यक आहे तसेच मुलांची जिज्ञासा वाढुन गणिती कौशल्याबद्दल कार्यानुभव विषयाचे ज्ञान मिळावे यासाठी मार्डी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या वतीने आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते .
    अशा उपक्रमातून  दैनंदिन व्यवहार ज्ञान व कल्पना शक्तीचा विकास होत असल्याची माहिती मुख्याध्यापक प्रल्हाद चंदनशिवे यांनी दिली .बाजार यशस्वी करण्यासाठी दिनेश गावडे, संदीप  सरतापे, रामप्रसाद  कांबळे, मंगल ठोंबरे, सुरज दिवटे ,सागर नारनवर, कोमल कदम  , गीतांजली देवकुळे ,सागर माने ,महादेव जाधव या शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .बाजार स्टँड परिसरात भरविला असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस पाटील आप्पासो गायकवाड व स्वयंसेवक यांची मदत घेण्यात आली .
   बालचमुच्या बाजारात 100 हुन अधिक दुकाने लावली होती. कांदा, मिरची , टोमॅटो, गवार, वांगी ,गाजर, मुळा, मेथी , पालक इत्यादी पालेभाज्यासह अंडी, शेवचिवडा, समोसे, वडापाव , पाणीपुरी , कापडी पिशव्या अशीही दुकाने लावण्यात आली होती तर पृथ्वीराज राऊत या विद्यार्थ्यांने लावलेल्या पाणीपुरी ला अधिक पसंती मिळाली .  बाजाराला पालकांसह ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत होता .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त