उंब्रज येथे चिकन गुनियाच्या साथीचे थैमान...सुमारे 70 हून अधिक रुग्ण उपचारार्थ

ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

कराड : कराड तालुक्यातील उंब्रज येथील वार्ड क्रमांक पाच व सहा मध्ये चिकनगुनिया सदृश्य साधने सुमारे ६० ते ७० ग्रामस्थ गावातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.दरम्यान रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने या साथीकडे कानाडोळा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान एका घरातील तीन ते चारहुन अधिक रुग्ण सध्या उपचारासाठी दाखल असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,उंब्रज येथे वार्ड क्रमांक पाच व सहा मध्ये मागील आठ दिवसांपासून रहिवाशांना ताप थंडी, सांधेदुखी,अंगदुखीचा त्रास सुरू झाला. सुरूवातीला एकदोघांना त्रास झाला मात्र किरकोळ उपचारांनी बरे न वाटल्याने या रुग्णांना अॅडमीट करावे लागले. 

आठवड्याभरात या साथीचा झपाट्याने फैलाव झाला असून सुमारे ६० ते ७० जणांना त्रास सुरू झाल्याने हे ग्रामस्थ गावातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत.दरम्यान सदरची साथ ही चिकणगुणिया सदृश्य असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त