प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी चार कबरी कोणाच्या?

पाचगणी  : छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या व इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यालगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. या ठिकाणी अफजलखानाच्या कबरी बरोबर सय्यद बंडा याची देखील कबर शेजारीच होती. मात्र, अनधिकृत बांधकाम पाडत असताना या दोन्ही कबरींच्या काही अंतरावरच आणखी चार कबरी कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत.

यातील एक कबर ही सेवेकऱ्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि दुसरी कबर शिवकालीन नसल्याचे दिसून येत असल्याचे स्थानिक सांगतात. तिसरी कबरीचा दाखला इतिहासकालीन नसल्याचे सांगितले जात आहे. इतर दोन कबरी अलीकडच्या काळातील असल्याचे स्पष्ट होत आहे. तर काही स्थानिक सांगतात एक कबर इतिहासकालीन आहे. अन्य दोन कबरी अलीकडच्या काळातील असल्याचे स्थानिक सांगतात.

अफजलखानाच्या बरोबर लढण्यास एका सरदार आलेला होता. त्याचे नवीन लग्न झाले होते. तो प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये मारला गेला म्हणून त्याच्या कबरीला दुल्हे मियाची कबर, असे म्हटले जाते, असे स्थानिकांनी सांगितले. दुसरी कबर अलीकडच्या काळातील ख्वाजा मिया याची आहे. तो अफजलखान कबरीच्या सेवेसाठी आला होता. त्याचा मृत्यू कबरीची सेवा करताना झाला होता. या कबरीचा मजार म्हणून उल्लेख केला जातो. तर अन्य दोन कबरी अलीकडील काळातील आहेत. या कबरीवर कोणतीही माहिती लिहिलेली नाही.

अफजल खानाच्या कबरी शेजारी आणखी चार कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या ? याबाबत सध्या माहिती घेण्याचं काम महसूल विभागाकडून केले जात आहे. या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. दरम्‍यान, प्रशासनाच्या वतीने मोठ्या पोलिस बंदोबस्‍तात या कबरी शेजारील अतिक्रमण हटवण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला