लादी पाव विक्रेत्यांच्या संपामुळे 30 लाखाची उलाढाल ठप्प मैद्याचे भाव वाढल्याने विक्रेते हवालदिल
Satara News Team
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यातील उंब्रज कराड कोरेगाव रहिमतपूर पाचवड आणि परळी येथील सुमारे 50 हून अधिक लादी पाव विक्रेत्यांनी तीन दिवसाचा संप पुकारल्यामुळे सातारा शहर तालुका आणि परिसरातील लादीपावाची विक्री शुक्रवारी ठप्प झाली गेल्या वर्षभरात मैद्याच्या किमतीत पाचशे रुपयांनी वाढ झाली व इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने लादी मागे दहा रुपये दरवाढ करावी लागणार असल्याचे लादी पाव असोसिएशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले सातारा शहरातील नागरिकांना तीन दिवस पावच उपलब्ध होणार नसल्याने खवय्यांची अडचण झाली आहे सातारा शहर आणि परिसरात तब्बल 50 बेकरी असून रोजची पावची उलाढाल 25000 लादी आहे एका लादीचा दर 40 रुपये गृहीत धरल्यास दिवसाची उलाढाल दहा लाखापर्यंत होते तीन दिवसाच्या या संपाचा सातारा शहर आणि परिसराला साधारण 30 लाख रुपयांचा फटका बसला आहे लादी पाव असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी सेवन स्टार इमारत परिसरात बैठक घेऊन या संदर्भातील आपली भूमिका मांडली यासंदर्भात बोलताना संदीप शिंदे म्हणाले मैद्याचे रेट 15 मार्च 2022 पासून चौदाशे रुपयावरून त्याच पर्यंत तब्बल पाचशे रुपयांना वाढले आहेत तसेच तेलाचा डबा पूर्वी अकराशे रुपयाला मिळत होता तो आता साडे सतराशे रुपयाला मिळत आहे भट्टी साठी लागणारे लाकूड चार रुपये मनाने मिळत होते ते आता नऊ रुपये मनाने मिळत आहे त्यामुळे सर्वच कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे प्रत्येक लादी मागे दहा रुपये वाढीचा प्रस्ताव आम्ही दिला आहे मात्र लादी पाव महाग झाल्यास त्याचा फटका वडापाव विक्रेते हॉटेलवाले यांना बसणार आहे सातारकरांनाही संप यशस्वी झाल्यास पन्नास रुपये दराने लादीपाव घ्यावा लागणार आहे असोसिएशनच्या सदस्यांनी सकाळी पवई नाका येथे सुमारे कोरेगाव वरून येणारी 70 ते 80 पावलादी पकडल्या संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांनी संप सुरू असल्याची जाणीव करून दिली त्यावेळी उभयतांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सलग तीन दिवस म्हणजे रविवार पर्यंत संपत सुरू राहणार असल्याने सातारा शहर आणि परिसरामध्ये लादीपावाची तीव्र चणचण जाणवणार आहे रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका लादीपावाला बसला आहे या दोन देशातील युद्धामुळे भारताने मदत म्हणून पंजाब आणि महाराष्ट्रातील बहुतांश गहू तिकडे पाठवल्यामुळे पावासाठी आवश्यक लागणारा गहू सुद्धा उपलब्ध होताना बऱ्याच अडचणी येत असल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले

स्थानिक बातम्या
शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
संबंधित बातम्या
-
शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
-
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
-
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
-
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेबेवाडीत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 10th Feb 2023 07:44 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 10th Feb 2023 07:44 pm











