भाजपमुळेच मतदारसंघात विकासाचा झंजावा .......आ. शिवेंद्रसिंहराजे

शिवाजीनगर- भाटमरळी ते पावक्ता, भाटमरळी ते कुसवडे रस्त्याचे भूमिपूजन

सातारा- स्व. भाऊसाहेब महाराज यांच्यामुळे सातारा तालुका आणि माझे ऋणानुबंध अतूट आहेत.  भाऊसाहेब महाराजांच्या विचाराने आपण एकत्र काम करतोय. आज भारतीय जनता पार्टीला उज्वल भविष्य आहे. भाजपमुळेच सातत्याने भरीव निधी उपलब्ध होत आहे आणि सातारा- जावली मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरु आहे. आगामी लोकसभा असो किंवा अन्य कोणतीही निवडणूक असो आपण सर्वांनी भाजपच्याच उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.  


भाटमरळी ता. सातारा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून ५ कोटी रुपये निधी मंजूर झालेल्या शिवाजीनगर- भाटमरळी ते पावक्ता आणि भाटमरळी ते कुसवडे या रस्त्यांचे भूमिपूजन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते लालासाहेब पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, सुरेंद्र देशपांडे, सयाजी चव्हाण, राजेंद्र यादव, विजय पोतेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 
   

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पुनर्रचनेमध्ये मतदारसंघ वेगळा झाला असे मी कधीच समजत नाही. सातारा तालुक्यातील जनतेसोबत असलेले माझे नाते कोणीही तोडू शकत नाही. अजिंक्यतारा कारखान्याच्या रूपाने शेतकऱ्याच्या जीवनात बदल घडवणारी संस्था सुरू झाली. शेतीसाठी मुबलक पाणी आणि उसाला उच्चांकी दर दिला जात आहे. कारखान्याची उच्चांकी रिकव्हरी आहे. कारखान्याने शेतकऱ्यांची विश्वासहर्ता कमावली आहे. तालुक्यातील जनतेसोबत माझी नाळ जोडली गेली असून कोणावर कोणतेही संकट येऊ द्या, चांगली अथवा वाईट वेळ असू द्या मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या भागातील सर्व कामे मार्गी लावली आहेत. कुसवडे धरण झाले आहे. कॅनॉलसाठी निधी मिळवलाय. बंदिस्त पाईपलाईनने पाणी जास्तीत जास्त शेतीला मिळेल. धनवडेवाडी पूल उंची वाढवणे, परमाळे घाटाचे काम लवकरच सुरू होईल. 


भाजपचा आमदार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला नेहमीच ताकद देण्याचे काम केले आहे आणि त्याच माध्यमातून मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी भरीव निधी मिळत आहे. आपणही भाजपच्या  पाठीशी ताकतीने उभे राहिले पाहिजे. कोणतीही निवडणूक असो आपण सर्वांनी भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी केले. 


सयाजी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमास हिंदराज जाधव, सुभाष पवार, संभाजी जाधव, विनायक जाधव, नारायण क्षीरसागर, केशव चव्हाण, नितीन चव्हाण, जगन्नाथ चव्हाण, दिनकर पवार, सुरेश पवार, आबासाहेब देशमुख, बाळासाहेब जाधव, गणेश जाधव, प्रशांत चव्हाण, डॉ. प्रताप जाधव, संतोष देशमुख, अशोक जाधव, शंकर जाधव, जोतिराम चव्हाण, अरुण जाधव, राजेंद्र जाधव, संदेश जाधव, अनिकेत पवार, संतोष जाधव, विठ्ठल देशमुख, रविंद्र जाधव, अशोक बल्लाळ, रामचंद्र जंगम यांच्यासह भाटमरळी, कुसवडे गावचे सरपंच, सर्व सदस्य, विविध मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.  

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला