महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेडछाड करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयितास एक वर्षाची सक्तमजुरी
सकलेन मुलाणी
- Tue 13th Sep 2022 08:42 am
- बातमी शेयर करा

कराड | महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेडछाड करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने संशयितास एक वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास पुन्हा एक महिन्याची साधी कैद शिक्षा सुनावली आहे. सडकसख्याहरींकडून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले असून त्याला आळा घालण्यासाठी कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी दिलेली ही शिक्षा महत्त्वपूर्ण मानली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिली. संतोष उत्तम पवार (वय- 32, रा. आगाशिवनगर, ता. कराड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले की, संतोष पवार याने जानेवारी 2021 मध्ये विद्यानगर (ता. कराड) येथील एका कॉलेज परिसरात पीडित कॉलेज युवतीचा पाठलाग केला. मोटरसायकल वरून संबंधित विद्यार्थिनीच्या पुढे-मागे करून कृष्णा सर्कल ते नवीन पुलाकडे जाणार्या सार्वजनिक रस्त्यावर पीडित मुलीचा हात पकडून ’तू मला आवडतेस’ अशी भाषा वापरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. संबंधित पीडित महाविद्यालयीन विद्यार्थिनीने ही बाब आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी शिक्षण घेणार्या मुलींना वारंवार त्रास होत असल्याने याची गंभीर दखल घेत कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. चोरगे यांनी तपास केला. त्यानंतर संशयिताला अटक करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायाधीश के. एस. होरे यांच्या न्यायालयात या खटल्याचे सुनावणी झाली. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. या कामी पीडित मुलगी व तिची मैत्रीण तसेच पंच व तपासी अधिकारी यांनी नोंदवलेल्या साक्षी व सरकारी वकील यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने संशयितास एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाचे शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक महिने साधी कैद अशीही शिक्षा न्यायालयाने दिली आहे. अॅड. राजेंद्र सी. शहा यांना कॉन्स्टेबल अशोक मदने, गोविंद माने, गोरे, पवार, पाटील यांनी सहकार्य केले.
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Tue 13th Sep 2022 08:42 am
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Tue 13th Sep 2022 08:42 am
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Tue 13th Sep 2022 08:42 am
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Tue 13th Sep 2022 08:42 am
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Tue 13th Sep 2022 08:42 am
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Tue 13th Sep 2022 08:42 am
संबंधित बातम्या
-
घातपात करण्याचा प्रयत्न होता; एसटी काय तुझ्या गोठ्यात आली होती का?
- Tue 13th Sep 2022 08:42 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी लोकसेवक कि अवैध व्यवसाय सेवक?
- Tue 13th Sep 2022 08:42 am
-
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Tue 13th Sep 2022 08:42 am
-
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Tue 13th Sep 2022 08:42 am
-
म्हसवड पोलिसांची अवैध दारुविक्री व दारु वाहतूकीवर कारवाई ; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
- Tue 13th Sep 2022 08:42 am
-
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Tue 13th Sep 2022 08:42 am
-
ऊस तोडीच्या पैशाच्या कारणावरून चुलत्याचा खून पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा
- Tue 13th Sep 2022 08:42 am
-
पत्नीचा खून, मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या पतीला शिरवळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Tue 13th Sep 2022 08:42 am