सातारा शहरातील ११ विकासकामांसाठी १० कोटी निधी

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; नगर विकास विभागाकडून मिळवला निधी

सातारा- सातारा पालिका हद्दीतील विविध विकासकामे सातत्याने मार्गी लावणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून पालिका हद्दीतील ११ विकासकामे मार्गी लावण्यासाठी तब्ब्ल १० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 


विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधी देण्याची मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. शिंदे आणि ना. फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनुसार १० कोटी निधी मंजूर झाला असून मंजूर निधीतून शाहूपुरी येथील रांगोळे कॉलनी येथे पोहण्याचा तलाव बांधणे (२ कोटी ५० लाख), भैरोबा टेकडी परिसर उद्यान व सुशोभीकरण करणे (२ कोटी), किल्ले अजिंक्यतारा येथे स्ट्रीट लाईट बसविणे (१ कोटी), गोडोली येथे हॉलीबॉल, कबड्डी, कुस्तीसाठी क्रीडांगण विकसित करणे (९० लाख), सदरबझार येथील अजिंक्य कॉलनी येथे उद्यान विकसित करणे (८० लाख), सदरबझार येथील गणेश कॉलनी येथे उद्यान विकसित करणे (८० लाख), शनिवार पेठेतील गोरक्षण बोळ येथे रस्ते काँक्रीटीकरण करणे (२० लाख), करंजे तर्फ शाहूपुरी येथील शिवाजीनगरमधील ओपन स्पेस विकसित करणे (२० लाख), शकुनी मंदिर ते गुरुवार पेठ समाजमंदिर ते शाहू उद्यान अर्चना अपार्टमेंट ते हिंदवी स्कुल अखेर रस्ता खडीकर, डांबरीकरण करणे (४५ लाख), सदरबझार येथील लीलाबाई हौसिंग सोसायटी येथील परिसर विकसित करणे व शेड बांधणे (१० लाख) आणि किल्ले अजिंक्यतारा रॉड येथील स्मृती उद्यान विकसित करणे (१ कोटी ५ लाख रुपये) हि कामे मार्गी लागणार आहेत. 

 

निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर कामे सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा पालिका प्रशासनाला केल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला