आलेवाडी गावात शेतात ज्वारी काढत असताना शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू

जावळी: जावळी तालुक्यातील आलेवाडी येथे आज सायंकाळी चारच्या सुमारास शेतात ज्वारी काढत असताना अंगावर वीज पडून गणेश जगन्नाथ दुटाळ वय 34 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला या धक्कादायक घटनेमुळे दुताळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घरातील करता पुरुष म्हणून गणेश डुटाळ हे कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते आज दुपारी ते शेतात आपल्या कुटुंबा समवेत ज्वारी करत होते अचानक वातावरणात कमालीचा बदल झाला सोसाट्याचा वार आकाशामध्ये विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरुवात झाला यातच शेतात ज्वारी काढत असलेले गणेश दुधाळ यांच्या अंगावर वीज कोसळली आणि या अपघातात ते गंभीर स्वरूपात भाजले व त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळावर महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झाले व त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद देखील तहसील कार्यालयासह तालुका प्रशासनामध्ये करण्यात आली आहे त्यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी असा परिवार आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त