तापोळा मंडलात शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत वारस फेरफार अदालत आयोजित

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील अतीदुर्गम भागांतील तापोळा मंडळामध्ये अनेक मयत खातेदार यांच्या प्रलंबित वारस नोंदी असल्याने राज्य शासनाच्या सुशासन - शासन आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत दि.३१ (शुक्रवार) रोजी सदर मंडलातील स्थळ - पदमावत्ती मंदीर, तापोळा ता. महाबळेश्वर जि. सातारा या ठिकाणी वारस फेरफार अदालत आयोजित केली होती. 

त्यानुसार तापोळा मंडलातील 1. वेळापूर 2. वानवली त आटेगाव, 3. पाली त् आटेगाव , 4. तापोळा, 5. कोट्रोशी, 6. हरचंदी, 7. कळमगाव कळमगर, 8. आमशी, 9. सौदरी, 10 कुरोशी 11. लाखवड, 12. आचली,13. मंजरेवाडी, 14. देवसरे, 15. येर्णे बु 16. येर्णे खु, 17. वेंगळे, 18. खांबील चोरगे, 19. वानवली त सोळशी, 20. गोगवे, 21. रामेघर 22. वारसोळी कोळी, 23. वारसोळी देव या गावाचे तापोळा मंडलामध्ये शिबीर आयोजित करण्यात आले.

 सदर कार्यक्रमाचे अनुशंगाने मौजे तापोळा येथील पदमावत्ती मंदीर मध्ये वरील नमुद गावाचे सजा निहाय वारस नोंदी कामी पुढील प्रमाणे अर्ज प्राप्त् झाले. 1. सजा - सौदरी 15, गोगवे 31, कोट्रोशी 08, वेगळे 08, वेळापूर 10, आचली 05, उचाट 10 असे एकुण 87 अर्ज वारस नोंदीसाठी अर्ज प्राप्त झालेवरुन सदर प्राप्त अर्जावर वारस नोंदी बाबत ऑन लाईन कारवाही करणेत आली. तसेच, निवीन / दुबार शिधा पत्रिका केशरी 259 कार्ड, पिवळे - 49 असे एकुण 308 शिधा पत्रिकेचे वाटप करणेत आलेले आहे. ॲग्रॅस्टॅक शेतकरी यांचे रजिष्टेशन करुन घेणेत आलेले आहे. मा. राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी सोा. वाई यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती तेजस्विनी खोचरे- पाटील, तहसिलदार महाबळेश्वर यांनी सदर शिबीराचे यशस्वीरित्या आयोजन केले. 

सदर शिबिरामध्ये श्री. दिपक सोनावले, निवासी नायब तहसिलदार श्री. विनोंद सावंत, महसुल नायब तहसिलदार महसुल, श्री. रुपेश शिंदे, श्री. विजय खरात, कार्यालयीन कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व सेतू विभागातील कर्मचारी यांनी कामकाज केले. सदर शिबीरास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादर मिळला, अशी माहिती महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त