लंपी मुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना मिळणार अर्थसहाय्य
प्रकाश शिंदे - Tue 27th Sep 2022 06:43 am
- बातमी शेयर करा
सातारा : गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लंपी त्वचा रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी व पशुपालकांच्या मृत पावलेल्या पशुधनास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचा आदेश राज्याच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने काढला असून त्यासाठी जिल्हास्तरावर मुख्यकार्यकारी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव राज्यातील 21 जिल्ह्यात झपाट्याने पसरला आहे. उद्भवलेल्या लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहेत. लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी व पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झाला आहे अशा शेतकरी पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे 100 टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याबाबत व त्याची अमंबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे आदेश मंत्रीमंडळाच्या बैठकीत देण्यात आले आहेत.
लंपी त्वचारोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचा शेतकरी, पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखन्यावरील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस-पाटील, तसेच स्थानिक दोन नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा करुन घ्यावयाचा आहे. या पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लंपीमुळे झाला असल्याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. समितीने पंचनाम्याच्या आधारे खातरजमा करुन संबंधित शेतकरी व पशुपालकांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी शिफारस करुन पंधरा दिवसाच्या आत संबंधित पशुपालकांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा करावी. दुधाळ जनावरे गाय व म्हैस प्रत्येकी 30 हजार रुपये (3 मोठी दुधाळ जनावरांसाठी), बैल 25 हजार रुपये (3 मोठी जनावरांपर्यंत), वासरे 16 हजार रुपये (6 लहान जनावरांसाठी) असे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
कशी राहणार समिती
जिल्हास्तरावरील समितीमध्ये जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकार्यांनी
नामनिर्देशित केलेला उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जि. प. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय (संबंधित) हे सदस्य तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 27th Sep 2022 06:43 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 27th Sep 2022 06:43 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 27th Sep 2022 06:43 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 27th Sep 2022 06:43 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Tue 27th Sep 2022 06:43 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Tue 27th Sep 2022 06:43 am
संबंधित बातम्या
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Tue 27th Sep 2022 06:43 am
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Tue 27th Sep 2022 06:43 am
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Tue 27th Sep 2022 06:43 am
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Tue 27th Sep 2022 06:43 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Tue 27th Sep 2022 06:43 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Tue 27th Sep 2022 06:43 am
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Tue 27th Sep 2022 06:43 am
-
आठ तालुक्यात पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
- Tue 27th Sep 2022 06:43 am













