ज्ञानज्योतीने प्रतिकुल परिस्थितून शिक्षणाचे कवाड खुले केले : ऍड.वहागावकर
Satara News Team
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
- बातमी शेयर करा
सातारा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत म.फुले यांच्या मदतीने शिक्षणासाठी महान असे कार्य करून खऱ्या अर्थाने शिक्षणाचे कवाडे खुले करून दिले आहेत. असे प्रतिपादन प्रा.ऍड.विलास वहागावकर यांनी केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुळ्याजवळ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे उपाध्यक्ष ऍड. वहागावकर मार्गदशन करीत होते.अध्यक्षस्थानी धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे होते.
प्रारंभी,भन्ते दिंपकर,दिलीप फणसे,शाहिर प्रकाश फरांदे,सौ. कल्पना कांबळे आदींनी डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भन्ते दिंपकरजी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडण्यात आला.ज्ञानज्योती यांच्या प्रतिमेस द्राक्षा खंडकर यांच्यासह महिला व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिवसभर अभिवादन केले.समता सैनिक दलातर्फे मानवंदना दिली. ज्ञानज्योती यांच्या जीवनचरित्रावर शाहिर श्रीरंग रणदिवे व सौ. कल्पना कांबळे यांनी अनुक्रमे पोवाडा व गाणी यांच्या माध्यमातून प्रबोधन केले. प्रास्ताविक अनिल वीर यांनी केले.वंचित संघर्ष मोर्चाचे महासचिव श्रीरंग वाघमारे यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ट नेते दादासाहेब केंगार, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,वंचित संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर काकडे,राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष ऍड. हौसेराव धुमाळ,पी.टी. कांबळे, कु.हर्षदा राक्षे,कु.सायली गवळी, समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ,हृषीकेश तथा रावण गायकवाड,आकाश कांबळे, डी. के.क्षीरसागर,मोहन यादव,सौ. स्नेहल खरात,सौ.पूजा साळुंखे, दयानंद शिरसाट,शंकर वायदंडे, अजय सोनकांबळे, शिवनाथ जावळे,प्रकाश भोसले,शांताराम वाघमारे,दिलीप बनसोडे,हृषीकेश सौरटे,तुकाराम गायकवाड, यशपाल बनसोडे, वसंत सावंत, विविध संघटनांचे पदाधिकारी, समतासैनिक, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 3rd Jan 2023 04:06 pm













