कवठे येथील श्री जोतिर्लिंग विद्यालयात पाद्यपूजन आणि औक्षण समारंभ संपन्न

मसूर: शाळा हे संस्काराचे केंद्र आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्काराची नितांत गरज आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी-विद्यार्थिनी गुणवत्तेत मागे पडणार नाहीत याची काळजी घेण्याबरोबरच ते संस्कारातही मागे राहू नयेत यासाठी विद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते असे प्रतिपादन श्री जोतिर्लिंग विद्यालय कवठे चे मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांनी केले. कवठे (मसुर) ता.कराड येथील श्री जोतिर्लिंग विद्यालयात गुरुप्रतिपदेचे औचित्य साधून माता-पिता पाद्यपूजन व औक्षण सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांनी  सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन केले. यावेळी उपशिक्षक सुनील साळुंखे, दिलीप माने, राजेंद्रप्रसाद चव्हाण, शिक्षकेत्तर कर्मचारी नितीन यादव, दीपक दाभाडे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी इ.10 वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पाद्यपूजन करून कुंकुमतिलक लावून चरणस्पर्श केला व आशीर्वाद घेतले.याप्रसंगी उपशिक्षक सुनील साळुंखे, पालक अशोक किरत, सौ.शितल शेलार, विद्यार्थिनी कु. अंजली माने यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत एस. जी. साळुंखे, आर.आर.चव्हाण, नितीन यादव, दीपक दाभाडे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिलीप माने यांनी केले. दीपक दाभाडे व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी वसले, मला हे दत्तगुरु दिसले हे ईशस्तवन सादर केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला