स्वतंत्र सैनिक, संजय गांधी निराधार, अपंग व्यक्ती यांना वेळेत मानधन देण्यात यावे : संजय भोसले

कराड उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी

कराड  : बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यावतीने स्वातंत्र्य सैनिक, संजय गांधी निराधार, अपंग व्यक्ती तसेच रेशनिंग दुकानांच्या मशनिं संबंधित निवेदन कराडचे नायब तहसीलदार राठोड साहेब यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कराड उत्तर चे तालुका प्रमुख .संजय भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की स्वतंत्र सैनिक, संजय गांधी निराधार, अपंग व्यक्तींना वेळेत मानधन देण्यात यावे व स्वस्थ धाण्य दुकानात मशिन चालत नसल्यामुळे जो त्रास ग्राहकांना सहण करावा लागतो त्यावर सुध्दा काहितरी पर्याय प्रशासनाच्या वतीने काढण्यात यावा. 

   या मुख्य मागणीचे निवेदन संजय भोसले कराड उत्तर तालुकाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी नायब तहसीलदार राठोड यांना दिले व प्रशासनाने योग्य तो तोडगा न काढल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहिल असा इशाराही याप्रसंगी देण्यात आला. यावेळी उपस्थित .पोपट कांबळे, संजय बांदल, विशाल कदम, गणेश जांभळे, सुमित जाधव, रोहित कांबळे व शिवसैनिक उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त