बोरगाव पोलीसानी ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत केला जेरबंद
7,40,000/- सात लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त- Satara News Team
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
- बातमी शेयर करा
सातारा : दिनांक-04/12/2024 रोजी सकाळी 07.00 वा. ते 14/12/2024 रोजीचे सकाळी 07.00 वा.चे दरम्यान मौजे फत्यापुर ता. जि. सातारा येथे तक्रारदार यांचे राहते घराशेजारी मोकळ्या जागेत लावलेली ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी 40,000/- रु किंमतीची असलेली ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबतचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाणेस दिनांक-18/12/2024 रोजी दाखल करण्यात आलेला होता
. त्या अनुषंगाने श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना सदर गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच अज्ञात चोरट्यांचा शोध घेवुन कारवाईबाबतच्या सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे डीबी पथकाचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण व पोकॉ अतुल कणसे यांना गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की, एक महिन्द्रा कंपनीचा ट्रक्टर क्रमाक MH11-DA- 9615 हे संशयितरित्या नांदगाव ता. जि. सातारा गावाच्या आवारत वावरताना दिसल्याचे सांगितले. त्यावरुन डीबी पथकाने सदर ट्रक्टरचा शोध घेवुन त्यावरील चालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला म्हणुन त्यास विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता त्याने मीच सदरची फनपाळी चोरुन आणल्याचे सांगुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्यानंतर त्यास ताब्यात घेवुन गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त पंचनामाव्दारे हस्तगत करुन गुन्ह्यात वापरलेला एक महिन्द्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा ट्रक्टर क्रमांक MH11-DA-9615 असे वाहन जप्त करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले ट्रक्टर असा एकुण 7,40,000/- सात लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन सदर गुन्ह्यात धनराज शरद जगदाळे वय-20 वर्षे रा-नांदगाव ता. जि. सातारा या आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
मा.श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा व श्रीमत डॉ. वैशाली कडुकर अप्पर अधिक्षक सातारा, श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांचे सुचनेप्रमाणे व श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पोकॉ अतुल कणसे, पोकॉ केतन जाधव यांनी सदरची कारवाई केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहवा विजय म्हेत्रे हे करीत आहेत
स्थानिक बातम्या
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
बोरगाव पोलीसानी ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत केला जेरबंद
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
संबंधित बातम्या
-
अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना अटक 2 देशी बनावटीची पिस्टल, 2 मॅक्झीन, 2 जिवंत काडतुसे जप्त
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
-
चौधरवाडी तालुका फलटण येथे ट्रांसफार्मर ची चोरी.
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
-
लहानग्या मुलीला कृष्णा नदीत टाकून मातेचीही आत्महत्या
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
-
फलटण येथे विना परवानगी तडीपार बिलाल रफिक कुरेशी यास शहर पोलिस अधिकारी यांनी केली अटक
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
-
अ.ब.ब.... न्यायाधीश : लाच प्रकरणातील मध्यस्थी खासगी इसम मुंबईचा फौजदार...
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
-
प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत सातारा तालुका पोलीसांनी ठोकल्या बेडया
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
-
साताऱ्यातील भोंदू बाबाचा पितळ पडलं उघडं भोंदू बाबा चे कारनामे दहिवडी पोलिसांनी केले उघडणे
- Thu 19th Dec 2024 05:21 pm
-
साताऱ्यातील फुलांच्या कास पठारावर रेव्ह पार्टीत धुडगूस; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- Thu 19th Dec 2024 05:21 pm