शिवकालीन शासकीय पाणंद अतिक्रमणांच्या विळख्यात
तहसीलदारांनी लक्ष घालावे: नागरिकांची मागणी- Satara News Team
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
- बातमी शेयर करा
उंब्रज : रस्ता म्हणजे विकासाचा मार्ग, कायमस्वरूपी पक्क्या रस्त्यांशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणे शक्य नाही. परंतु, राज्यात बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागात नेमकी याच्या अगदी उलट परिस्थिती आढळून येत असल्यामुळे त्या त्या भागांचा विकास खुंटला आहे. आजही ग्रामीण भागातील शिवकालीन शासकीय पाणंद रस्ते स्वतःचे अस्तित्व शोधत असून अक्षरशः नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत ही आपल्या प्रगत महाराष्ट्रासाठी खूप मोठी शोकांतिका आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे शासनाचे राजस्व अभियान तळागाळात अधिक प्रभावीपणे राबवून समाजाच्या प्रगतीचा मार्ग असलेले रस्ते खुले करणे ही काळाची गरज आहे. शासकीय रस्त्यांवर होत असलेल्या अतिक्रमणांची समस्या ही दिवसेंदिवस अधिकच जटिल बनत चालली असून गंभीर रूप धारण करीत आहे... असाच काहीसा प्रकार कराड तालुक्यातील मौजे कळंत्रेवाडी हद्दीत असलेल्या शिवकालीन शासकीय पाणंद रस्त्याच्या बाबतीत घडलाय.
शासन दरबारी जवळपास ३३ फुटांची नोंद असलेली ही शिवकालीन शासकीय पाणंद लगतच्या शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडली असून सध्या जेमतेम पाच ते सहा फुटांची राहिली आहे. स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी धडपडत आहे. येथील नानेगाव (पुनर्वसन)गावठाणातून पुढे सुकाई मंदिराकडे जाणारी जवळपास ३३ फुटांची शिवकालीन शासकीय पाणंद सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडली आहे. लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे शासन दरबारी ३३ फुटांची नोंद असलेल्या या पाणंद रस्त्याची रुंदी जेमतेम पाच ते सहा फुटांवर आली आहे. त्यामुळे येथून ये-जा करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतमालाची वाहतूक सोडा, साधे पायी चालत जाणे अवघड बनले आहे.येथील शेतकरी शंकर तुकाराम थोरात यांनी सदर पाणंद अतिक्रमण मुक्त,खुली करण्यासाठी आजवर शासन स्तरावर वेळोवेळी तोंडी अथवा लेखी पाठपुरावे केलेले आहेत. परंतु,त्या पाठपुराव्यांना म्हणावे असे यश आलेले दिसत नाही. त्यामुळे तहसीलदार साहेबांनी स्वतः जातीने या प्रश्नी लक्ष घालून सदर शिवकालीन शासकीय पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून अतिक्रमणग्रस्त पाणंद रस्त्याचा श्वास खुला करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
पाठपुराव्यांना अद्यापही यश नाही...!
"सदर अतिक्रमणग्रस्त शिवकालीन शासकीय पाणंद खुली करण्यासंदर्भात मी वेळोवेळी शासन स्तरावर तोंडी अथवा लेखी पाठपुरावे केलेले आहेत.परंतु,अद्यापही म्हणावे तसे यश आले नाही.
श्री शंकर तुकाराम थोरात (शेतकरी-कळंत्रेवाडी)"
#umbraj
स्थानिक बातम्या
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
बोरगाव पोलीसानी ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत केला जेरबंद
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
संबंधित बातम्या
-
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
-
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
-
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
-
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
-
कर्मवीर विद्यापीठात समुह विद्यापीठाबाबत कार्यशाळेचे आयोजन
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
-
स्वतंत्र सैनिक, संजय गांधी निराधार, अपंग व्यक्ती यांना वेळेत मानधन देण्यात यावे : संजय भोसले
- Thu 19th Dec 2024 01:13 pm
-
'सातारा हाॅस्पिटल व सातारा डायग्नोस्टीक सेंटर'यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर
- Thu 19th Dec 2024 01:13 pm