कर्मवीर विद्यापीठात समुह विद्यापीठाबाबत कार्यशाळेचे आयोजन

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्या वतीने दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी "समूह विद्यापीठ प्रशासकीय संरचना व शिक्षकेतर सेवकांची भूमिका" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्रात डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबईचे कुलसचिव प्रो. डॉ. विलास पाध्ये हे मार्गदर्शन करणार आहेत. कर्मवीर विद्यापीठातील सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असून कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे.

 कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलसचिव प्रो. डॉ. विलास पाध्ये हे समूह विद्यापीठाची संकल्पना, प्रशासकीय संरचना, समूह विद्यापीठाबाबत महाराष्ट्र शासनाची भूमिका आणि समूह विद्यापीठाच्या विकासामध्ये शिक्षकेतर सेवकांची भूमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत तर विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. दुसऱ्या सत्रात कर्मवीर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार हे कर्मवीर विद्यापीठाची प्रशासकीय संरचना, विविध अधिकार मंडळे, समित्या विविध विभाग व त्यांची कार्ये, घटक महाविद्यालयाची संकल्पना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. 


 राज्यात समूह विद्यापीठाची संकल्पना नवीन असून ग्रामीण भागात समूह विद्यापीठाची संकल्पना राबवण्याचे पहिले श्रेय रयत शिक्षण संस्थेला मिळालेले आहे. ग्रामीण भागातील हे एक आदर्श विद्यापीठ होण्यासाठी विद्यापीठाचे कुलाधिकारी श्री. चंद्रकांत दळवी, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, संस्थेचे सचिव श्री. विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेणकुदळे, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे हे विशेष प्रयत्न करीत आहेत. विद्यापीठाचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी विद्यापीठातील सर्व प्रशासकीय सेवकांना उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात असून गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत.


 सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी कार्यशाळेचे समन्वयक श्री. विद्याधर कांबळे, सौ. बिना निपाने, श्री. तानाजी सपकाळ, श्री. अशोक मसने परिश्रम घेत आहेत. या कार्यशाळेसाठी घटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रिं. डॉ. भारत जाधव, प्रिं. डॉ. राजेंद्र मोरे, विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. डॉ. विठ्ठल सावंत, प्रो. डॉ. दादा नामदास, प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे, प्रो. डॉ. रघुनाथ साळुंखे, परीक्षा व मुल्यापमान मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. हेमंत उमाप, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ. धनाजी जाधव, सर्व संचालक, चेअर प्रोफेसर आदि उपस्थित राहणार आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त