'सातारा हाॅस्पिटल व सातारा डायग्नोस्टीक सेंटर'यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

BSL, BP, SPO2,गरजेनूसार ईसीजी,जनरल चेकअप या सुविधा मोफत
सातारा : भैरवनाथाच्या यात्रेनिमीत्त जय भैरवनाथ मित्र मंडळ बामणोली-मुंबईच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमीत्त सातारमधील नामांकित 'सातारा हाॅस्पिटल व सातारा डायग्नोस्टीक सेंटर'यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये BSL, BP, SPO2,गरजेनूसार ईसीजी,जनरल चेकअप या सुविधा अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.या शिबीरामध्ये दुर्गम भागातील शंबर पेक्षा अधिक लोकानी सहभागी होऊन मोफत आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच भैरवनाथाच्या यात्रेनिमीत्त शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये बामणोली केंद्रातील न्यू इंग्लिश स्कूल बामणोली,शासकिय आश्रमशाळा,जि.प.शाळा देवाची शेंबडी,पावशेवाडी,बामणोली,सावरी,म्हावशी,तेटली,मुनावळे व अंधारी इत्यादी शाळांच्या मुख्याध्यापक,शिक्षक व २०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

   यामध्ये विद्यार्थ्यानी लेझीम,डान्स,गायन व वकृत्व या कला सादर केल्या.त्यानंतर जय भैरवनाथ मित्र मंडळ बामणोली-मुंबईच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व शैक्षणिक उपक्रम संपन्न झाला.


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त