विधानपरिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांना मा. ना. डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापतीं यांनी दिली  विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि. ८ :  (वार्ताहर/प्रतिनिधी ) : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3) अन्वये, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे विधानपरिषद सदस्य म्हणून निर्वाचित विधानपरिषद सदस्यांनी आज दिनांक 08 जुलै, 2022 रोजी विधान भवन, मुंबई येथे विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेवर निवडून आलेले श्री.रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर, श्री.एकनाथराव गणपतराव खडसे, श्री.प्रविण यशवंत दरेकर, श्री.सचिन मोहन अहिर, प्रा.राम शंकर शिंदे, श्री.अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप, श्री.प्रसाद मिनेश लाड,  श्रीमती उमा गिरीष खापरे, श्री.आमश्या फुलजी पाडवी, श्री.श्रीकांत पंडितराव भारतीय या दहा सन्माननीय सदस्यांनी मध्यवर्ती सभागृह, विधानभवन, मुंबई येथे आज  विधानपरिषदेच्या  मा.उप सभापती डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभा सदस्यांद्वारे विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठीची ही निवडणूक जून, 2022 मध्ये झाली.  विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य तथा माजी मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा सदस्य श्री. कालिदास कोळंबकर, श्रीमती मंजुशा गावित, विधानपरिषद सदस्य तथा माजी मंत्री श्री.अनिल परब, श्री.अभिजित वंजारी, श्री.निलय नाईक, श्रीमती मनिषा कायंदे, विधानसभा माजी सदस्य तथा माजी मंत्री श्री.हर्षवर्धन पाटील, विधानसभा माजी सदस्य श्री.राज के.पुरोहित, विधानपरिषद माजी सदस्य श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.शिवाजी दौंड, यांच्यासह दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य तसेच विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत, उप सचिव श्री.राजेश तारवी, निर्वाचित सन्माननीय सदस्यांचे स्नेही, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त