11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालत

सातारा,:  सातारा मुख्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका  न्यायालयात दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडापात्र फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.जिल्ह्यातील न्यायालयात लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जे धेाटे  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या लोक अदालतीत धनादेश न वाटलेली  प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरणे, वैवाहिक  वाद, थकीत ग्रामपंचायतीची मालमत्ता कर व पाणी बिलाचे प्रकरणे इत्यादी सर्व प्रकारणांचा समावेश आहे. येत्या लोकदालतीमध्ये न्यायाधीश, पॅनल विधीज्ञ, सरकारी वकील, इत्यादी तडजोड घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत. तरी सर्व पक्षकरांनी जास्तीत जास्त संख्येने संबंधित न्यायालयात सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती  नि. जाधव आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी केले आहे.

लोकन्यायालयाचे फायदे

खटल्यामध्ये साक्षी – पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते.लोकन्यायालयाचा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाची जय होतो ना कोणाची हार होते. त्यामुळे निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकात  द्वेष  वाढत नाही व कुटुताही  निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणारे निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा दोन्हीचीही बचत होते. व लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणामध्ये कायद्यानुसार कोर्टा फी ची  रक्कम परत मिळते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त