प्रा.साै.सरस्वती वाशिवले व साै.मंदा वाशिवले यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 प्रधान

वाई: महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून वाशिवली ता.वाई ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या व समाजप्रबोधनकार  प्रा.साै.सरस्वती वाशिवले व साै.मंदा वाशिवले यांना देण्यात आला . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने राज्य शासनाने ग्रामस्तरावर पुरस्कार देण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर निवड समिती तयार करुन या समितीने निवड केलेल्या महिलांना आज पुरस्कार देण्यात आले . वाशिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री.चंद्रकात जाधव ,सदस्य श्री.सुनिल वाशिवले,साै.नंदा वाशिवले,अंगणवाडी सेविका साै.माया खरात,आशा वर्कर साै.कमल वाशिवले, माजी सरपंच श्री.लक्ष्मण वाशिवले,पोलिस पाटिल सचिन वाशिवले,  मुख्याध्यापक मा. श्री.भास्कर पोतदार ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाशिवली. श्री.गणपत वाशिवले,विठ्ठल वाशिवले,शिवाजी कोंढाळकर,शिवाजी वाशिवले,तुकाराम  वाशिवले,सर्वोदय सेवा ट्रस्टचे खजिनदार श्री.ज्ञानदेव वाशिवले सर सह आदि मान्यवर उपस्थित होते. " पुरस्काराने प्रेरणा मिळते, प्रेरणेने राष्ट्र घडते " असे  प्रेरणादायी वाक्याने  श्री.भास्कर पोतदार यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त  महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे,याकरिता वाशिवली ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ', यांच्या जंयत्ती निमित्त , 31 मे रोजी महिला सन्मान पुरस्काराचे वितरण  उपसरपंच चंद्रकात जाधव यांचे हस्ते करण्यात आले .पुरस्कार प्राप्त महिला सौ.सरस्वती ताई वाशिवले ,यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली.चैतन्यमय ,उत्साहपूर्ण वातावरणात महिलांना सन्मानीत करण्यात आले.या वेळी सौ.सरस्वती ताई  वाशिवले यांना  महिलांच्या सबलीकरणासाठी आणि एकात्मिक बाल विकास कार्यक्रम, स्त्री शिक्षण, जन जागृती अश्या अनेक सामाजिक,शैक्षणिक, अध्यात्मिक, साहित्यिक कार्या ची मिळालेल्या गौरव पुरस्काराची स्तुती केली गेली,त्यांचा या कार्यसाठी अनेक नामवंत सामाजिक संस्था कडून त्यांना गौरविले आहे ,या मध्ये 'या पूर्वी मिळालेले पुरस्कार सन 2016 - राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा विषय -महिला सबलीकरण,सन 2018- स्त्री शिक्षण ,सन 2020- 'मावळा ग्रुप राज्यस्तरीय  'आदर्श कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार'सन 2023सर्वांगी प्रतिष्ठान वाई अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार, आदरणीय सारंग पाटील आयोजित महिला गुणगौरव सोहळा सन 2022 आदिशक्ती अॅवार्ड वाई सातारा जिल्हा ध्यास फाऊंडेशन सातारा, दिपस्तंभ नारी सन्मान पुरस्कार, तसेच रोटरी क्लब वाई,  तालुका स्तरीय काव्यलेखन स्पर्धा, /निबंध- राष्ट्रस्तरीय सन्मान पत्र महिला-, काव्य, नाट्य,एकांकीका विविध स्पर्धा विषय महिलांशी निगडीत हुंडाविरोधी विडंबन गीते,स्त्री भ्रूणहत्या  पथनाट्य, अध्यात्मिक प्रवचने-समाज उद्बोधनअनेक ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्यासाठी सन्मान चिन्ह ,सन्मान पत्र देऊन गौरविले  , या प्रसंगी,सौ. सरस्वती ताई वाशिवले. यांनी मिळालेली पुरस्काराची रोख रक्कम समाज उपयोगी कामासाठी ग्रामपंचायतीत उपसरपंच यांच्याकडे पुन्हा सुपूर्द करुन एक चांगला संदेश देण्याचे काम सरस्वती वाशिवले यांनी केले त्यामुळे  त्यांच्या दानप्रवृत्तीचे गोड कौतुक ग्रामस्थांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला