पुणे कराड महामार्गालगत अवैध धंद्याचे 'पीक'...! देहविक्रीचा व्यवसाय सुसाट...
सतिश जाधव
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
- बातमी शेयर करा

देशमुखनगर : पुणे कराड महामार्गावर ठिकठिकाणी लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. सातारा परिसरात महामार्गावरील व्यावसाय विस्तारित होऊन लगतच्या ग्रामीण भागात सुरू झाला आहे.
सातारा परिसरातील महामार्गावर लॉजची संख्या अलीकडच्या काळात बरीच वाढली आहे, यातील बहुतांश लॉजवर खुलेआम देहव्यापार केला जात असून तरुण-तरुणींना शरीर संबंधासाठी सहज रूम उपलब्ध करून दिल्या जातात. यात शाळा, महाविद्यालयीन तरुण, तरुणीचा समावेश आहे.
कायद्यानुसार धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, वस्तीग्रह, रुग्णालय आदी सार्वजनिक ठिकाणापासून 200 मीटर परिसरामधील लॉज मध्ये देहविक्री व्यवसाय करता येत नाही, या भागातील महामार्गालगत असलेल्या लॉजिंग मध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असून आजूबाजूच्या भागात असलेल्या वसाहतीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत आहे. काही लॉजच्या दोनशे मीटरच्या आत शैक्षणिक संस्था, वस्तीग्रह आहेत त्यामुळे वस्तीमध्ये असलेल्या लॉजवर अवैध व्यवसाय करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे वादग्रस्त लॉजवर कारवाई करून लॉज कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
महामार्गावर सुरू असलेल्या या अवैधच्या व्यवसायाला चाप बसावा म्हणून पोलीस प्रशासन ठोस पावले उचलत नाहीत, त्यामुळेच महामार्गालगत त्यांचे देव फुटले आहे. स्थानिक पोलीस प्रशासन फक्त बघायची भूमिका घेत असल्याने हा लाजचा व्यवसाय वाढू लागला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईची विशेष मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. तसेच या महामार्गावरील लॉजमध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर लक्ष ठेवून कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिक करीत आहेत.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी ता.खटाव येथील हुतात्मा स्मारकाला भ्रष्टाचाराची वाळवी
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
-
शिखर शिंगणापूरमधील आमरण उपोषण अखेर स्थगित!
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
-
वडी ता.खटाव येथील पारायण सोहळा दि.१४ तर मुख्य यात्रेस दि.२१ पासून प्रारंभ
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Wed 5th Apr 2023 06:51 pm
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Wed 5th Apr 2023 06:51 pm