निंबळक येथे मुलीची आत्महत्या

फलटण :- मौजे निंबळक एका मुलीने तिच्या खोलीत अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० रोजी सायंकाळी ६:१० वाजण्याच्या सुमारास मौजे निंबळक ता. फलटण गावाच्या हद्दीत वैभवी अर्जुन शिंदे (वय २० वर्ष, रा. निंबळक ता. फलटण) या मुलीने तिच्या खोलीत गेली होती. यानंतर सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या फिर्यादी चारुदत्त भीमराव शिंदे (वय २० वर्ष, रा. निंबळक ता. फलटण) यांचे चुलते घरी आले असता त्यांनी घराचा दरवाजा उघडण्यासाठी वाजवला असता वैभवी अर्जुन शिंदे हिने दरवाजा उघडला नाही. फिर्यादी चारुदत्त भीमराव शिंदे यांनी दरवाजा उघडला नाही म्हणून खिडकीतून पाहिले असता वैभवी हिने अँगलला गळफास घेतल्याचे दिसताच दरवाजा तोडून उपचारासाठी फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी वैभवी हिस तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पो.ना अभंग करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त